भजनातून भक्तीचा आनंद घ्या -केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरिंचे उदगार..
नागपुर – अमृतधारा आणि मातृशक्ती रेशीमबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य भजन स्पर्धेची महाअंतीम फेरीचे बक्षीस वितरण गडकरीच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, याप्रसंगी माननीय नितीनजी गडकरी यांनी गजानन महाराज श्रद्धा स्थानात जाऊन संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले आणि संतकवी कमलासुत मार्गावरील कमलासुतांच्या जीवनीचे उद्घाटन केलं या भजन स्पर्धेत पूर्व नागपूर विभागातून भजनी हरिओम महिला भजन मंडळ,पश्चिम नागपुरातून अविष्कार कला संस्था, उत्तर नागपूर विभागातून हरिओम महिला भजनी, गोधणी, दक्षिण विभागातून नादब्रह्म भजनी मंडळ, मध्य विभागातून स्वरविहार भजनी मंडळ, दक्षिण पश्चिम विभागातून आदिशक्ती भजन मंडळ, या सर्व भजनी मंडळाना प्रथम पुरस्कार 11001 रोख आणि गौरव चिन्ह आदरणीय नितीनजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
एकूण त्रेचाळीस भजनी मंडळांना पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार मोहन मते, आमदार नागोजी गाणार, भजन स्पर्धेचे आयोजक गिरीश वराडपांडे ,ऍड रमण सेनाड, देवेंद्र दस्तुरे आदी उपस्थित होते. भजन स्पर्धेचे प्रास्ताविक स्पर्धेचे आयोजक गिरीश वराडपांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले. भजन स्पर्धेसाठी मातृशक्ती नी नवरात्रानिमित्त जय चिंतन केलं याबद्दल नितीनजींनी भजनी मंडळातील मातृषक्तींचे आभार मानले भजन हे भगवंताची सेवा करण्याचं माध्यम आहे याद्वारे भक्तीचा आनंद घ्या असा भावनिक संदेश नितीनजी ने दिला.या भजन स्पर्धेत सहा विभागातून प्रत्येकी 7 भजनी मंडळाची निवड करण्यात आलेली आहे अशी एकूण 43 भजनी मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक विभागातून 11001/, 7001/, 5001/, 4001/, 3001 आणि उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी 2501/ सोबत गौरव चिन्हासहीत भव्य पुरस्कार वितरण करण्यात आले या भजन स्पर्धेसाठी प्रकाश निमजे, दीपक वाळके, दादाराव वाकरे, भारती वाळके चित्रा मानकर सौ गौरी रक्षीये,चंद्रा भोसले, संजय रक्षीये,राधिका ताई ठाकरे ममता मानकर,सुशांत कडू,सुनीताताई धाराशिवकर आदी मातृशक्तींचे सहकार्य लाभले.
