नागपूर :- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे ४ मार्च २०२४ रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई येथून ३ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. लोढा ४ मार्च रोजी सकाळी चंद्रपूरकडे प्रयाण करतील, ते सकाळी ११ वाजता वन अकॅडमी येथील ‘इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिझनेस कॉनक्लेव्ह’ला उपस्थित राहतील. सायंकाळी ५.०० वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील. रात्री ८.०० वाजता नागपूर विमानतळावरुन ते मुंबईकडे प्रयाण करतील.
डॉ. सुरेश खाडे यांचे ४ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार असून ते रात्री १०.०० वाजता विमानतळाहून पुण्याकडे प्रयाण करतील.