संदीप कांबळे, कामठी
– शेतातील विद्युत ताराच्या घर्षणाने आग लागल्याचा अंदाज
कामठी, ता.१८ : तालुक्यातील पळसाड गावात दत्तात्रय करडभाजने यांच्या शेतात शनिवार ता.१६ दुपारच्या सुमारास उसाला आग लागल्याने साडे चार एकरात उभ्या पिक जळल्याने अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले .
मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील रहिवासी दत्तात्रय करडभाजने यांची साडे चार एकर शेती आहे. मागील तीन वर्षांपासून उसाचे पिक घेत आहे शेतमालकांनी देखरेख करीता प्रल्हाद चौधरी यांना कामावर ठेवले. शनिवार ता.१६ रोजी दुपारी तीन ते साडे तीनच्या सुमारास अचानक आग लागली याची सूचना गावातील विकास भगत यांनी शेतमालकला दिली. परंतु शेतमालक शेतात पोहोचेपर्यंत पूर्ण ऊस जळून खाक झाला होता. लगेच याची सूचना गुमथळा विद्यूत वितरणाला देण्यात आली. मात्र अद्याप कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्यांने शेतमालकाची साधी विचारपूसही केली नाही. अखेर सोमवारला मौदा पोलिसात तक्रार करण्यात आली मौदा पोलिसांनी तक्रार घेऊन कामठी तहसिलदार यांचेकडे पाठविण्याचे आश्वासन शेतकऱ्याला देन्यात आले. शेतातील विद्युत ताराच्या घर्षणाने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सोबतच तलाठी यांनी शेतात पोहोचून पंचनामा सुद्धा अद्याप केला नसल्याने शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार किंवा नाही याबाबत शेतकरी विचारात सापडला आहे. याबाबत गुमथळा विद्यूत वितरणाचे प्रभारी सहायक अभियंता हेमंत सोळंकी यांच्याशी संपर्क केले असता सांगितले की बुधवारला शेतात जाऊन शहा निशा करण्यात येणार असल्याचे व नंतरच नेमकी आगीचे कारण काय हे कळू शकेल. शेतकरी दत्तात्रय करडभाजने तहसिलदार अक्षय पोयाम यांच्याशी भेटून नुकसान भरपाईची मागणी केली.
शेतातील उस जळून अडीच लाखाचे नुकसान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com