– श्री क्षेत्र मिनिवाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे विस्तारीकरण साठी २५लाखा चे भुमी पुजन
– आमदार चरणसिंग ठाकूर यांचे वचन पुर्ती पर्वाला सुरूवात
– आता!!काटोल विधानसभा मतदारसंघाचा विकास थांबनार नाही
कोंढाळी :- ग्रामीण भागातील पलायन थांबले पाहिजे, ग्रामीण भागातील पलायन थांबवायचे झाल्यास , शेतकरी सुखी संपन्न झाला पाहिजे. या करिता शेतकर्यांचे शेतीला पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, पेयजला पासुन सर्वांगीण विकासासाठी आपण निवडून पुर्वी दिलेली वचनांची पूर्तता करण्यासाठी आमदार फंडातील पहिला विकास निधी दुर्गम भागातील मिनिवाडा या गावांसाठी २५ लाखांचा विकास निधी मंजूर केला आहे. अशी माहिती काटोल चे आमदार चरण सिंह ठाकूर यांनी काटोल तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे विस्तारिकरणा साठी दिले त्याचे भुमी पुजन प्रसंगी श्री क्षेत्र मिनिवाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे सभागृहात आमदार चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदारांनी शेतकर्यांचे शेतीला पाणी तसेच पेयजल व्यवस्थे साठी माननिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रिम प्रोजेक्ट जलयुक्त शिवार योजनेतून तसेस नळगंगा परियोजनेचे पाणी काटोल तालुक्यातील शेतकर्यांचे शेता पर्यंत पोहोचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करू असे सांगत कोंढाळी/मेटपांजरा जि प सर्कल विकासासाठी मागे पडू देणार नाही असे ही या प्रसंगी आमदारांनी आपल्या भाषणात सांगितले.
या प्रसंगी कृषी मित्र तथा भा ज पा चे महामंत्री दिनेश ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी व महायुती चे सरकार ग्रामीण भागातील शेतकरी ,कष्टकरी यांचे पिठीशी उभे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमातून आपले आमदार काटोल विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी वचन बद्द आहे. आपण चरणसिंग ठाकूर यांचे वर विश्वास टाकला त्यांनी दिलेली वचनांची पहली वचन पुर्ती ठरली आहे. तसचे महामार्ग जोड ते घुबडी गावापर्यंत सडक दुरूस्ती साठी वीस कोटी चां नीधी मंजूर केल्याची माहिती दिनेश ठाकरे यांनी दिली.
यह तो झांकी है-पांच साल बाकी है
या प्रसंगी माजी जि प सदस्य प्राध्यापक देविदास कठाणे यांनी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे वर सर्व मिनीवाडाविसीयांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही.आमदार चरणसिंग ठाकूर यांनी पहिला आमदार नीधी वारकरी संप्रदायात चे मागणीला साथ देत येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे सभागृहाचे विस्तारीकरणासाठी दिले. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर व नागरिकांसाठी *यह तो झांकी है-पांच साल बाकी है म्हणत या भागातील विकासात्मक कामासाठी विविध विभागातून आपले आमदार विकास निधी मंजूर करणार आहेत असे सांगितले. माजी सभापती संजय डांगोरे यांनी ही या प्रसंगी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रवीण लोणगाडगे यांनी श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे सभागृहासाठी जागा दिल्या बाबद त्यांचा ही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच वच्छला युवनाते, घुबडी चे सरपंच शीला कौरती, उपसपंच विजय डेहनकर,किशोर गाढवे,सतीश रेवतकर , योगेश गोतमारे, शामराव तायवाडे, दादाराव लोणगाडगे, निखील जयस्वाल, ह भ प नामदेव महाराज लोणगाडगे,विशाल काळबांडे, वरठी तसेच मिनिवाडा ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य, व शेकडो महिला पुरूष या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकह भ प नामदेव महाराज लोणगाडगे, संचलन ग्राम सचीव डाखोळे तर आभार चंद्रशेखर लोणगाडगे यांनी मानले.