महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
● खापरी, न्यू एअरपोर्ट स्टेशनवरून इ- रिक्षा उपलब्ध
नागपूर : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्या, ९ फेब्रुवारीपासून जामठा व्हीसीए स्टेडियमवर होणार असून महामेट्रोने क्रिकेटप्रेमींसाठी सेवा उपलब्ध करून दिली आहे. क्रिकेटप्रेमींना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत लोकमान्य नगर, ऑटोमोटिव्ह चौक आणि प्रजापतीनगर या टर्मिनल स्थानकांसह
सर्व मेट्रो स्टेशनवरून न्यू एअरपोर्ट मेट्रो किंवा खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतपर्यंत पोहोचता येणार आहे. या स्टेशनवरून जामठापर्यंत पोहोचण्यासाठी इ-रिक्षाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
भारत व ऑस्ट्रेलियामध्ये उद्यापासून पाच दिवसीय कसोटी सामना खेळला जाणार आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सामना रंगणार आहे. सामना सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत होईल. महा मेट्रोने नेहमीप्रमाणे क्रिकेटप्रेमींसाठी आताही सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मेट्रो दर १५ मिनिटांनी धावते. उद्यापासून मेट्रो दुपारी ३ ते ७ वाजेदरम्यान दर १२ मिनिटांनी धावणार आहे. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींना जलद वाहतूक सेवेचा लाभ मिळावा यासाठी दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत दर १२ मिनिटांनी मेट्रो ट्रेन सोडण्यात येणार आहे. व्हीसीएचे जामठा स्टेडियम न्यू एअरपोर्ट व खापरी स्टेशनपासून अनुक्रमे ७ आणि ६ किमी अंतरावर आहे. या स्टेशनवरून जामठा जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी महामेट्रोने याच दोन संघांतीळ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींना रात्री उशिरापर्यंत सेवा उपलब्ध करून दिली होती. महामेट्रोने नागपूरकर क्रिकेटप्रेमींना स्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.