योगा दिना निमित्य सकाळी ५ वाजता पासून मेट्रो सेवा उपलब्ध

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

• चार ही मार्गिकेवरील मेट्रो स्टेशन येथून मेट्रो सेवा उपलब्ध

नागपूर :- जागतिक योगा दिवस सर्वत्र साजरा केल्या जाणार असून २१ जून ( बुधवार) रोजी सकाळी ५ वाजता चार ही मार्गिकेवरील मेट्रो स्टेशन येथून (खापरी-आटोमोटिव्ह चौक,लोकमान्य नगर-प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) पासून महा मेट्रोची मेट्रो सेवा नागारिकांकरिता सुरु होईल. यशवंत स्टेडियम येथे सकाळी ६ वाजता सुरु होणाऱ्या जागतिक योग दिन कार्यक्रम साजरा केल्या जाणार असून त्यानिमित्याने महा मेट्रोने विशेष सेवा प्रदान करण्याचे नियोजन केले आहे. पहाटे ५ वाजता पासून दर १५ मिनिटांच्या अंतराने विशेष मेट्रो सेवा नागरिकांन करता उपलब्ध असेल. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो सेवेचा उपयोग करावा असे आवाहन महा मेट्रो नागरिकांना करत आहे. नागरिकांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास सेवा देण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे. योगा दिना निमित्य शहरात विविध ठिकाणी योगा दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रलंबित १७२६६ पात्र शेतक-यांनी आपले e-KYC तातडीने करावे - जिल्हाधिकारी

Wed Jun 21 , 2023
प्रलंबित लाभार्थींची e-KYC आता मोबाईल ॲपद्वारेही गडचिरोली :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण नियीजानासाठी राज्यात गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबवून e-KYC साठी सामाजिक सुविधा केंद्र (CSC) व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी IPPB (India Post Payment Bank) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजन करण्याबाबत सुचना प्राप्त आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com