प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रलंबित १७२६६ पात्र शेतक-यांनी आपले e-KYC तातडीने करावे – जिल्हाधिकारी

प्रलंबित लाभार्थींची e-KYC आता मोबाईल ॲपद्वारेही

गडचिरोली :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण नियीजानासाठी राज्यात गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबवून e-KYC साठी सामाजिक सुविधा केंद्र (CSC) व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी IPPB (India Post Payment Bank) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजन करण्याबाबत सुचना प्राप्त आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण जलद गतीने व्हावे याकरिता प्रलंबित लाभार्थ्यांची e-KYC तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्निकरण करणे बाबतची कार्यवाही तातडीने पुर्ण करणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात एकंदरीत १७२६६ पात्र शेतक-यांचे e-KYC प्रलंबित आहे. तसेच, एकूण ११८१४ पात्र शेतक-यांचे आधार क्रमांकासोबत बँक खाते संलग्नित नाहीत. तरी सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी तातडीने आपली ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले आहे.

केंद्र शासनाने पी.एम.किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामाईक सुविधा केंद्राव्दारे लाभार्थींची ई-केवायसी करणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने विकसित केलेल्या पी.एम.किसान ॲप मोबाईल वर चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) व्दारे पी.एम.किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नविन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वत:चे ई-केवायसी प्रमाणिकरणासह इतर ५० लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे.

मोबाईल द्वारे ई-केवायसी प्रमाणिकरण असे करा – “PMKISAN GoI” या नावाचे ॲप गुगल प्ले-स्टोअर वर उपलब्ध आहे. ज्या लाभार्थ्यांच्या मोबाईल मध्ये जुने ॲप असेल त्यांनी ते काढून पुन्हा पी.एम.किसान २.०.० हे अॅप्लीकेशन टाकावे. त्यानंतर येणा-या स्क्रीन वर इंग्रजी व हिंदी या दोन भाषा निवडण्याचा पर्याय दिलेला आहे. त्यापैकी एक पर्याय निवडावा. समोर दिसणा-या स्क्रीनमध्ये लाभार्थ्यांनी लॉगइन करावे. या अॅपच्या वापरासाठी शेतक-यांकडे त्यांचा पी.एम.किसान आयडी / Registration Id किंवा आधार क्रमांक आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असेल त्यांना तसा संदेश दिसेल. म्हणजेच त्या लाभार्थ्याची ई-केवायसी प्रलंबित आहे. नंतर समोर दिसणा-या ई-केवायसी या लिंक वर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी पीन प्रविष्ठ करावा. तद्नंतर समोर दिसणा-या स्कॅन फेस या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर फेस आरडी ॲप ची लिंक येईल ते ॲप घ्यावे. त्यानंतर मोबाईल मध्ये Capturing Face सुरु होईल त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांचे पालन करून Proceed या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर मोबाईल समोर धरून चेह-यावर प्रकाश दिसेल अशा पद्धतीने Scan Face या बटनावरती क्लिक करावे. तद्नंतर Image captured successfully processing असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर Successful e-KYC असा संदेश दिसेल म्हणजेच लाभार्थ्याचे e-KYC प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. इतर लाभार्थींची e-KYC करावयाची असल्यास Dashboard वरील e-KYC for other beneficiaries” या बटनावर क्लिक करावे व पुन;श्च वरीलप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करावी. जर हे शक्य नसेल तर नेहमी प्रमाणे सीएससी मार्फत प्रक्रिया पुर्ण करावी. 14 वा PM Kisan सन्मान हप्ता जमा होणे करीता आपले बँक खाते आधार सलग्न करणे आवश्यक आहे. त्या शिवाय केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा 6000 रू हप्ता बँकेत जमा होणार नाही.तरी सर्व पात्र शेतकरी यांनी e Kyc व Adhaar Bank link केले बाबतची खात्री आपले बँकेत करणे आवश्यक आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor, CM, Dy CM perform Yoga at Maharashtra Vidhan Bhavan

Wed Jun 21 , 2023
Mumbai :-Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by State Chief Minister Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis and Speaker Rahul Narwekar participated in a Yoga session ‘Yog Prabhat at Vidhan Bhavan’ on the occasion of International Day of Yoga in Mumbai on Wed (21 June). The Governor accompanied by the dignitaries performed yoga asanas under the guidance of Joint Secretary of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com