सर्व शैक्षणिक संस्थात होणार मेट्रो शिबिराचे आयोजन

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

• विद्यार्थ्यांमध्ये करणार परिवहना संबंधी जनजागृती

नागपूर :- नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, महा मेट्रो नागपूरने ही मेट्रो ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल केले असून दर १० मिनिटांनी मेट्रो सेवा कार्यानव्यित केल्या आहे ज्यामुळे नागरिकांचा कौल हा मेट्रोकडे वाढत आहे.ज्यामध्ये शैक्षणिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा उपयोग करीत आहे.महा मेट्रोच्या वतीने नागपुरातील शाळा आणि कॉलेजमध्ये शिबिराच्या माध्यमाने अनेक उपक्रम राबवत जनजागृती केल्या जात आहे.येत्या आठवड्यात यशोदा,आदर्श विद्या मंदिर, हडस, सोमलवार या शाळांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नागपूर मेट्रोच्या खापरी,ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रो सेवा सकाळी 8 ते रात्री 8 वाजता दरम्यान दर 10 मिनिटांनी उपलब्ध आहे तसेच नागपूर मेट्रोच्या वतीने प्रवाश्यान करता अनेक उपक्रम तसेच सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर अश्या सोई करण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये प्रामुख्याने :

• तिकीट काउंटर

• तिकीट व्हेंडिंग मशीन

• तिकीट बुकिंग ऍप

• महा कार्ड (१0 % डिस्काउंट)

• विद्यार्थी महा कार्ड (30 % डिस्काउंट)

• व्हॉट्सऍप तिकीटचा समावेश आहे.

महा मेट्रोच्या वतीने नागपुरातील सर्व शाळा व कॉलेज यांना आवाहन करण्यात येत आहे कि, नागपूर मेट्रो संदर्भात कुठलीही माहिती तसेच कुठलीही शंका असल्यास मेट्रो रेल प्रशासनाशी संपर्क साधावा जेणेकरून शिबिराच्या माध्यमाने त्यांच्या समस्येचे निराकरण करता येईल.

नागपूर मेट्रोने प्रवासी तिकीट संरचना केली असूनज्यामध्ये मेट्रो ट्रेनच्या भाड्यात 33% पर्यंत कपात करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांना महाकार्डवर मिळणाऱ्या 30% डिस्काउंट शिवाय नव्या संरचनेनुसार शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थीकरता हे भाडे जवळपास 50% पर्यत कमी झाले आहे. शहरात अलीकडच्या काळात रस्ते अपघात झाले आहेत, सुरक्षित आणि सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन महा मेट्रोच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. त्यासोबतच मेट्रो ट्रेनमध्ये (कुठलेही अतिरिक्त भाडे न घेता) सायकल सोबत घेऊन जाण्याची परवानगी देते हि वस्तुस्थिती विद्यार्थ्यांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देखील सुनिश्चित करते. महा मेट्रोने नुकतेच व्हॉट्सऍप तिकीट सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचत नाही तर यामुळे तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाहीशी झाली आहे.

नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत उपलब्ध असून नागपूर मेट्रो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आरामदायी आणि स्वस्त प्रवासाकरिता मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ISKCON Jagannath Rath Yatra Concludes with Great Enthusiasm

Wed Jul 10 , 2024
Nagpur :- The Jagannath Rath Yatra, organized by ISKCON Nagpur Center Sri Sri Radha Gopinath Mandir, culminated in a fervent celebration. Under the guidance of Sri L Lokanatha Swami Maharaj, a devoted disciple of ISKCON founder Acharya SriL Prabhupada, the chariot procession was warmly welcomed at numerous locations. The event began at 4:30 AM with Mangal Aarti, followed by Narasimha […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com