ग्राहक आयोगाच्या आदेशाविरुद्ध मेटा फेसबुकची हायकोर्टात धाव..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

आयोगाने दिला मेटा फेसबुक विरोधात निर्णय

गोंदिया :- आपल्या विरुद्ध होत असलेल्या अन्यायाविरोधात सामान्य नागरिकाने लढण्याचा निर्धार केल्यास काय होऊ शकते, याची प्रतीची गोंदिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने जगाला दाखवून दिली असून आपली ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर या व्यक्तीने न्यायासाठी चक्क भांडून मेटा व फेसबुक या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांना हादरे दिले आहेत. परिणामी, या कंपन्यांना स्वतःची बाजू सावरण्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घ्यावी लागली आहे.

 

त्रिभूवन भोंगाडे (रा. उमरी, ता. तिरोडा) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. ते फेसबुकचे सदस्य असून त्याचा वापर करीत असतात 16 सप्टेंबर 2020 रोजी त्यांना फेसबुक वर वॉलवर मारिया स्टुडिओची व्यावसायिक जाहिरात दिसली होती. त्या जाहिरातीमध्ये एका प्रसिद्ध कंपनीचे जोडे 599 रुपयांत उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे भोंगाडे यांनी ते जोडे खरेदी करण्यासाठी डेबिट कार्डद्वारे रक्कम जमा केली, परंतु त्यानंतर त्यांना जोडे पाठविण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत घेण्यासाठी मारिया स्टुडिओचा कस्टमर केयर नंबर मिळवून त्यावर संपर्क साधला, दरम्यान, पुढील आरोपीने पैसे परत करण्याचे आमिष दाखवून भोंगाडे यांच्या खात्यातून 6 हजार 969 रुपये काढून घेतले. विरुद्ध भोंगाडे यांनी द्विटर, फेसबुक इत्यादी माध्यमातून तक्रारी करून न्याय मागितला, पण मेटा व फेसबुकया दोन्ही कंपन्यांनी त्यांची दखल घेतली नाही. या करिता भोंगाडे यांनी गोंदिया जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली असता ग्राहक आयोगाने भोंगाडे यांचे 599 रुपये परत करण्याचे, तसेच त्यांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी 25 हजार रुपये भरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश फेसबुक इंडिया ऑनलाइन सर्व्हिसेस कंपनी व मेटा प्लॅटफॉर्म्स यांना दिले. मात्र, इतर 6 हजार 969 रुपये गमावण्यास भोंगाडे स्वत: ही कारणीभूत असल्यामुळे आयोगाने ती रक्कम परत करण्याची मागणी अमान्य केली आहे. आता फेसबुक व मेटा या कंपन्यांनी स्वतःविरुद्धच्या आदेशाला थेट उच्च न्यायालयात प्रकरण उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ आहे. मात्र एका सामान्य माणसाच्या धाड़साची चर्चा जिल्ह्यात रंगु लागली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भालेराव महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा..

Sat Sep 17 , 2022
सावनेर : पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थर संरक्षक कवच म्हणून महत्वाची भूमिका बजावतो. पृथ्वीवरील जीवांचे अतिनिलसंरक्षण करतो. यासाठी जगभरात १६ सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस साजरा केल्या जातो. स्थानिक भालेराव महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून आणि ओझोन दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, नॅक चे समन्वयक प्रा. मिलिंद बरबटे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com