– उपक्रमाला नागपूरकर युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : देशाचे हृदयस्थान असणाऱ्या नागपूर शहराला प्रगल्भ असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच ऐतिहासिक वारस्याचे दर्शन घडावे आणि शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती नव्या पिढीला मिळावी तसेच शहरातील समृद्ध वारस्याचे जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने नागपूर@२०२५ च्या वतीने ‘हेरिटेज वॉक’ चे आयोजन सीताबर्डी येथे करण्यात आले. या माध्यमातून स्वच्छ, सुंदर स्वस्थ नागपूरचा संदेश युवकांच्या ध्यानीमनी रुजविण्यात आला.
याप्रसंगी मनपाचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, नागपुर@2025 चे संयोजक निमिष सुतारिया, सिईओ मल्हार देशपांडे यांच्यासह अधिकारी एनजीओचे स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
हेरिटेज वॉकची सुरुवात सीताबर्डी स्थित श्री शिव मंदिर येथून करण्यात आली. हेरिटेज वॉक शिव मंदिर होत संगमेश्वर मंदिर पोहोचली युवा इतिहासकार अथर्व शिवणकर यांनी वॉकचे नेतृत्व केले यावेळी युवकांना मंदिरची विशेष माहिती देण्यात आली तर मुरलीधर मंदिर येथे हेरिटेज वॉकची सांगता करण्यात आली.दरम्यान ह्रिषीकेश करमरकर,अथर्व शेष आणि नीरज ताटेकर यांच्या स्वराधीश चमूद्वारे शास्त्रीय संगीत सादर करण्यात आले. तर रिद्धी रिद्धी विकामसी, कनक मसराम, ऋतुपरणा भगत, वल्लभ कावरे आणि आदित्य जंजाळ यांच्या बैठक नागपूर चमूद्वारे संगीत सादर करण्यात आले. हेरिटेज वॉकला शहरातील तरुण आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.