गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न

– शांती मंगल कार्यालयात सत्कार सोहळा संपन्न

रामटेक :- एन एम एम बी फाउंडेशन, नमो नमो मोर्चा, बेटी बचाव बेटी पढाव, रामटेक – पारशिवनी पत्रकार संघ, संताजी तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने शांती मंगल कार्यालय रामटेक येथे दहावी बारावी वर्गातील शालांत परीक्षेत अव्वल गुण घेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू, उत्तम कर्तव्य बजावणारे अधिकारी, शिक्षक तथा पत्रकारांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन परमात्मा एक आनंदधामचे संस्थापक लक्ष्मणराव बाबू मेहर हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार (भारत सरकार ) प्राप्त परशुराम खुणे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक उपसंचालक पी टी देवतळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नागपूर संजय पाटील , माजी जिल्हा परिषद सिईओ सुधीर वाळके, संचालक सुधाकर डांगे, राजकुमार राठौर राष्ट्रीय महामंत्री, अशोक राठौर राष्ट्रीय अध्यक्ष नमो नमो ओबीसी मोर्चा भारत, पंकज राठौर राष्ट्रीय उपाध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत, निलेश अग्रवाल प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत, उद्योगपती जगदीश माली, विनोद पाटील, संतोष कुलकर्णी, दिवाकर पाटणे, गोंदिया जिल्हा परिषद च्या सभापती छाया दसरे, माजी पंचायत समिती सभापती गुड्डू लिल्लारे, उद्योजक हेमंत नागपुरे , बिल्डर्स जगदीश माली, दिपांकर पाटने, पंचायत समिती चे उपसभावती नरेंद्र बंधाटे सहित विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुभाष नागपुरे व अजय खेडगरकर यांनी केले.

यापूर्वी विजय हटवार यांनी डॉक्टर डे चे औचित्य साधून शहरातील डॉक्टरांचा सत्कार केला होता. उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप केलेले होते. तसेच रियान हाॅस्पीटलचे संचालक प्रदीप बोरकर यांचाही सत्कार हटवार यांचेकडुन करण्यात आला होता. त्यानंतर मनसर येथील वृद्धाश्रमात जाऊन फळ वाटप करण्यात आले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेवारस बॅगने रेल्वेस्थानकावर प्रचंड खळबळ

Thu Jul 6 , 2023
-श्वान मार्शलकडून कुठलाच ईशारा नाही – नागपूर रेल्वे स्थानकावरील सायंकाळचा प्रकार नागपूर :-एका बेवारस बॅगने प्रचंड खळबळ उडाली. लगेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने कुठल्याही प्रकारचा घातपात असण्याचा ईशारा दिला नाही. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली. हा प्रकार बुधवार 5 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू दोन दिवसीय नागपूर दौर्‍यावर आहेत. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com