एकनाथ शिंदे यांच्या विश्रांतीमुळे बैठका रद्द; प्रकृती अस्वास्थतेमुळे वैद्याकीय सल्ल्यानुसार ठाण्यातील निवासस्थानी मुक्काम

ठाणे :- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज ८ ते १० सभा करत असल्याने प्रचंड धावपळ झाली होती. यातून थोडासा आराम करण्यासाठी दरे मुक्कामी आलो असून आपली तब्येत बरी नसल्याचे शिंदे यांनी सांगितले होते. दरे गावात विश्रांती घेतल्यानंतर रविवारी ते ठाण्यातील निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रिय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर? अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट, ‘या’ खात्यावर केला दावा

Tue Dec 3 , 2024
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी आजच्या बैठकाही रद्द केल्याचे समजते. गेल्या तीन चार दिवसांपासून ते आराम करत आहेत. दुसऱ्या बाजूला महायुतीमधील घटक पक्ष असेलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सत्तास्थापनेच्या आधी मंत्रिपदे मिळविण्यासाठी हालचाल सुरू केल्याचे दिसते. सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. सोमवारी रात्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com