“आपदा मित्र” नियुक्तीसाठी विविध संस्थांसोबत बैठक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपात्कालीन विभागाद्वारे शहरी भागतील आपत्ती व अतिवृष्टि कालावधीत सहकार्य करण्यासाठी “आपदा मित्रांची” नियुक्ती करण्यासाठी विविध संस्थेच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेमध्ये व मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांच्या उपस्थितीत सभा डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये घेण्यात आली.

उपरोक्त सभेमध्ये उपस्थित शहरी भागातील आपत्ती समयी व अतिवृष्टी कालावधीत सहकार्य करण्यास शैक्षणिक संस्था/ सामाजिक संस्था व इतर कार्यालयीन प्रतिनिधी यांना ज्या व्यक्तीस किंवा स्वयंसेवक यास आपत्ती समयी सहकार्य करावयाचे आहे. अश्या व्यक्तीकडुन संपर्क साधुन आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत वेबसाईटवर व्यक्तीगत माहिती प्राप्त् करुन घेण्यात येईल. त्या माहितीच्या आधारे त्यांना आपदा मित्र म्हणुन ओळखपत्र देण्यात येईल. तसेच या दरम्यान नियुक्त आपदा मित्राला अग्निशमन बचाव साहित्यासंबधी माहिती व प्रशिक्षण तसेच कार्डीओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR), प्राथमिक आरोग्य् सेवेबाबत प्रशिक्षण देण्यात येईल असे अजय चारठाणकर, अति आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांनी निर्देश दिले.

यावेळी 1) सहा. संचालक, राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय, राजनगर नागपूर येथील गगन उपाध्याय व राजेश सबनीस 2) मे. ऑल इंडिया इंस्टीटयुट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट गोकुल पेठ नागपूर येथील सुशिल यादव 3) मे. नागपूर शहर ग्रामीण क्षेत्र, सर्पमित्र संघ, नागपूर येथील शुभम पराळे 4) मे. मातृभुमी फाऊंडेशन, सहकार नगर, नागपूर येथील वेदांत जोशी 5) मे. जेडी स्पोर्टस फाऊंडेशन नागपूर येथील जयंत दुबळे व नॅशनल इंस्टीटयुट ऑफ स्विमींग नागपूर तर्फे डॉ. जयप्रकाश दुबळे 6) मे. रेव्हान रेस्क्यु व्हालेन्टीअर असोशिएशन , नागपूर तर्फे पृथ्वी रामटेके 7) मे. नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, नागपूर तर्फे जिनीत भीमटे 8) मे. इंडीयन इंस्टीटयुट ऑफ इंजीनियरींग कॉलेज, मकरधोकडा नागपूर तर्फे मनिष बोधनकर 9) मे. नॅशनल इंस्टीटयुट ऑफ फायर ॲन्ड सेफ्टी इंजीनियरींग, कस्तुरबानगर नागपूर तर्फे तरुण मंडपे 10) प्रहार समाज जागृती संस्था नागपूर तर्फे नागेश्वर पोडली 11) जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय कॉग्रेसनगर नागपूर तर्फे देवीदास भलमे याप्रमाणे शैक्षणिक संस्था/सामाजिक संस्था तसेच राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय व जिल्हा समादेशक, होमगार्ड येथील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागातील  तुषार बाराहाते, सहा विभागीय अग्निशमन अधिकारी, सतीश राहाटे, उप अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आरुषा आनंद, शहर प्रकल्प समन्वयक अधिकारी, अकलीम शेख, अग्निशमन अधिकारी प्रादेशिक प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, कळमना, प्रकाश कावडकर उप अग्निशमन अधिकारी , सक्करदरा अग्निशमन केंद्र व इतर अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी उपस्थित सर्व संघटनेचे प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाचे समापन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्व्हर फ्रिक्वेन्सी वाढवून कामाला गती यावी - जिल्हाध्यक्ष किरण अतकरी

Sat Jul 13 , 2024
भंडारा :- महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेची घोषणा केली आणि योजनेचे अर्ज भरण्यासाठी अक्षरशः झुंचड उडाल्याचे आपण पाहत आहोतं. मात्र ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरताना सव्हरमध्ये अनेक अडचणी येत आहेत. परिणामी आज सर्वस्त्र ऑफलाईनरित्या अर्ज जमा केले जात आहेत. जमा केलेले हे अर्ज देखील ऑनलाईन माध्यमातूनच भरावे लागणार आहेत. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com