नागपूर :- विदर्भातील भिक्खूंमध्ये समन्वय साधून त्यांना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच विनया विरुद्ध आचरण करणाऱ्या भिकूंचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय भिक्खु संघाच्या अंतर्गत असलेल्या विदर्भस्तरीय भिक्खू संघाची बैठक आज संघर्ष नगर येथील अलोका संघाराम महाविहार येथे महाराष्ट्र भिक्खू संघाचे अध्यक्ष धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी खेमधम्ममो महाथेरो, सत्यशील महाथेरो, उपगुप्त महाथेरो, महापंत महाथेरो, ज्ञानबोधि महाथेरो, धम्मज्योती महाथेरो, सत्यानंद महाथेरो, डॉक्टर धम्मोदय महाथेरो, संघधातू महाथेरो, धम्मपाल महाथेरो, जीवनज्योती महाथेरो, शीलपंत महाथेरो, संघपाल महाथेरो, संघकीर्ती महाथेरो, आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीचे सूत्रसंचालन ज्ञानरक्षित महाथेरो ह्यांनी, समापण विनय रक्खखीत महाथेरो यांनी केला.
याप्रसंगी अखिल भारतीय भिक्खु संघाचे सद्धधम्मादित्य स्मृतीशेष भंते सदानंद महाथेरो यांच्या धम्मपथीक या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. याचे प्रकाशन अलोका ट्रस्ट ने केले.
भिक्खू संघाच्या बैठकीत भिक्खु संघात सुसूत्रता आणणे, त्यांच्यात सांघिक भावना निर्माण करणे, भिक्खू संघाच्या नावाने जागेची व विहारांची नोंदणी करणे, भिक्खु आणि श्रामनेर यांची नोंदणी ठेवणे, त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, विनया विरुद्ध आचरण करणाऱ्या भिक्खुवर कार्यवाही करणे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील भिक्षूंना भिक्खु संघाच्या कमिटीत स्थान देणे. वेळोवेळी भिक्खुंच्या बैठकी घेणे, भिक्खुंच्या समस्या सोडविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आल्या.
या बैठकीला भन्ते प्रज्ञानंद, भन्ते सारीपुत्त, भन्ते शीलज्योती, भन्ते नंदबोधि, भंते कुशलधम्मा, भन्ते धम्मानंद, भंते जीवक, भन्ते कुशलमुनी, भन्ते धम्मप्रिय, भंते सोन, भन्ते संघानंद, भन्ते बोधी, भन्ते सारीपुत्त, भन्ते बोधी अतिवासू, भन्ते शांतीज्योती, भन्ते कौडीन्य, भंते वफ्फ, भन्ते प्रज्ञानंद, भंते सम्यकबोधी, शुद्धचित्त, भन्ते गुनानंद, भन्ते पय्यासिरी, भन्ते सुदत्त बोधी, भन्ते चंद्रमणी, भन्ते पटीसेन, भंते शांतीदेव, भन्ते तन्हणकर, भन्ते सुमंगल, भन्ते प्रवीण बोधी आदी भंतेंनी यात भाग घेतला.