नागपूर :- अनेक वर्षापासून देशातील मानवी मूल्यांचा नाश ब्राह्मणी व्यवस्थेकडुन सतत होत आहे त्यामुळेच बहुजनांची संस्कृति सुद्धा नष्ट होत आहे, जाती जाती , धर्मा धर्मा मधे एक अघोषित संघर्ष सुरु होऊन मानवतेचा विचार सुद्धा लोप पावत आहे.देशाच्या कनकोप रयातुन येत असलेल्या बातम्या याचे द्योतक आहे.तरी सुद्धा आपले सगळे सहित्तीक , कवि , लेखक आपल्या लिखानातून अशा प्रवृत्ति विरुद्ध आवाज सुद्ध बुलंद करतांना दिसत नाही”.
” सर्व जाती धर्मातील लेखक, कवि , कलावंत , पथनाट्यकार,तथा सामाजिक कार्यकर्ते यांची सांगड घालून मानव मुल्यांना संवर्धित करण्या करिताच फुले, शाहू, आम्बेडकरी विचारांची पुरोगामी प्रबोधन चळवळ उभारण्याची गरज आहे ” असे विचार चळवळीचे प्रणेते रमेश बिजवेकर यांनी व्यक्त केले.
भंडार येथील विश्राम भवनात दि 29 नोव्हे 23 ला पुरोगामी प्रबोधन चळवळ निर्माण करण्यासाठी भा.डॉ. बाबासाहेब आम्बेडकर सोशल फोरम च्या वतीने कवि, लेखक, पथनाट्यकार,कलावंत तथा सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सभेचे अध्यक्ष स्थान फोरम चे महाराष्ट्र चे संस्थापक सदस्य तथा महासचिव मा.जयप्रकाश भवसागर यांनी भूषविले.
सभेला प्रवीण कांबळे, शैलेन्द्र आम्बुलकर, रवि हाडे, रंगराज गोस्वामी, माजी न्यायाधीश ऍड. महेंद्र गोस्वामी, के.झेड. शेंडे, सदानंद इलमे, अमृत बंसोड़, प्रेमसागर गणवीर, एम.डब्लू. दहीवले, परमानंद बागड़े,आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
” भारत देशाची प्रगति व विकास हा फुले, शाहू, आम्बेडकरी विचारांच्या सहाय्याने लवकर होउ शकेल तसेच धर्मनिरपेक्ष , जातिविरहित समाजाची निर्मितीचे धेय्य साध्य करण्याचे सामर्थ्य याच विचारात असल्याचे ” सभेचे अध्यक्ष जयप्रकाश भवसागर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनातून सांगितले.
सभेचे संचालन जिल्हाध्यक्ष अरुण गोंडाने यांनी तर आभार प्रदर्शन असित बागड़े यांनी केले. सभेला कैलाश गेडाम,मोरेश्वर गेडाम, महादेव मेश्राम,डॉ.प्रवीण थुलकर, डी वाय बड़ोले, सुरेश मेश्राम, डॉ शुद्धोधन घरडे, सुदेश वैद्य, डी व्ही बारमाटे, नरेंद्र भोयर, विलास नागदेवे, अभय रंगारी,सिद्धार्थ भोवते, ए पी मेश्राम, सूर्यकांत हुमने, राजेन्द्र काळे, रूपचंद रामटेके, अरविंद रामटेके, किशोर माटे, नंदकिशोर मेश्राम , महेंद्र वाहाने आदि कार्यकर्त्यांनी सभेच्या यशस्वीते साठी परिश्रम घेतले.