नागपूर :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री. 1 डिसेंबर 2023 रोजी नागपूर भेटीवर येत असून विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत.
मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथून दि. 1 डिसेंबर रोजी दुपारी 1.15 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. दुपारी 4 वाजता ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सव उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच सायंकाळी 5.30 वाजता वर्धा रोडवरील पावनभूमी क्रीडांगण येथे आयोजित होणाऱ्या गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायं.7.15 वाजता मुश्रीफ कोल्हापूरकडे रवाना होतील.