जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम

यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने न्याय सेवा सदन येथे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते.

कार्यक्रमाला जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव के. ए. नहार तर प्रमुख वक्ते जी. आर. कोलते व प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश शेख मो. जुनेद मो जलाल तसेच वकील मंडळी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पीएलव्ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.न्हावकर यांनी ठराविक प्रकरणात मध्यस्थी प्रक्रिया राबविता येतात. कौटुंबिक वाद, विवाह संबंधातील वाद असतील तर ते मध्यस्थीने मिटविता येते. तसेच दोन्ही पक्ष‌कारांमध्ये संवाद असेल तर कोणताही वाद मिटवू शकतो, असे सांगितले.

या कार्यक्रमात प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश शेख मो.जुनेद मो.जलाल यांनी वैकल्पीक वाद निवारण केंद्र, दिवाणी प्र. स. चे कलम ८९ वर मार्गदर्शन केले. न्याय मिळावा म्हणून मध्यस्थी प्रक्रिया अमलात आणली आहे. यामध्ये दोन्ही पक्ष सहमत असतील तर वाद मिटवला जातो. मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षकारांना कमी वेळेमध्ये न्याय मिळवुन देवू शकतो. प्रकरणे कोणत्याही टप्यावर असतांना मध्यस्थीकडे पाठविला जावू शकतो. तसेच वाद न्यायालयाबाहेर निकाली काढण्याचे व जलद न्याय मिळविण्याच्यादृष्टीने कलम ८९ महत्वाचे आहे, असे सांगितले.

प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश जी.आर. कोलते यांनी मध्यस्थी कायदा २०२३ विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी या कायद्यातील तरतूदी, मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षकारांमध्ये वाद सहजासहजी मिटवू शकते, तसेच वकीलांनी पक्षकारांना मध्यस्थी मध्ये सामावून घ्यायला पाहिजे असे सांगितले. सचिव के. ए. नहार यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन अँड. पुष्पा जैन यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विविध शासकीय विभाग जिल्हा परिषद शाळेत झरी जामणी आकांक्षित तालुक्यात अनोखा उपक्रम

Wed Sep 25 , 2024
यवतमाळ :- निती आयोगाच्यावतीने आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात झरी जामणी तालुक्याचा समावेश आहे. कार्यक्रमांतर्गत ‘विविध शासकीय विभाग जिल्हा परिषद शाळेत’ हा अनोखा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध विभागांचे गावस्तरावरील शासकीय कर्मचारी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागाचे गाव स्तरावरील कार्य, जबाबदाऱ्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेले विविध उपक्रम आणि योजना याबद्दल विद्यार्थ्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com