– बदलाची भाषा पत्रकारांनी अवगत करावी: चिंचोलकर
– बार्शीत राज्यस्तरीय पहिले डिजिटल मीडिया पत्रकार संमेलन उत्साहात.
सोलापूर :-माध्यमाची परिभाषा बदलली आहे. रोज माध्यमामध्ये सतत्याने बदल होत आहेत.हा बदललेला आवाज देखील समाजमनाचा असला पाहिजे असे मत या संमेलनाचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मीडीया संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केले
व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेच्या बार्शी (जि. सोलापूर) शाखेच्या वतीने राज्यस्तरीय पहिल्या डिजिटल मीडिया पत्रकार संमेलन उत्साहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
या संमेलनास स्वागताध्यक्ष म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख रविंद्र चिंचोलकर होते. प्रमुख पाहुणे आ. राजेंद्र राउत, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, राज्य उपाध्यक्ष संजय मालानी, शिक्षण कमिटी प्रदेशाध्यक्ष चेतन कात्रे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विजय चोरडिया, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हुंकार बनसाडे, संशोधक रेणुका कड, अमर चौडे आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप काळे यांनी व्हॉईस ऑफ मीडिया विषयी सविस्तर भूमिका मांडत आगामी काळात व्हॉईस ऑफ मीडिया काय करणार आहे हे ही सांगितले. रविंद्र चिंचोलकर यांनी पत्रकारितेमध्ये सतत्याने बदल होत आहेत ते बदल पत्रकारानी स्विकारावेत असे मार्गदर्शन यावेळी केले. आपल्या भाषणात आ. राऊत यांनी पत्रकारांचे विषय सभागृहात मांडून बार्शी येथे पत्रकारभवन उभारू असे आश्वासन दिले.
दिवसभर या संमेलनात पत्रकारानी डिजिटल माध्यमाची कास कशी धरावी यावर मार्गदर्शन करण्यात आले. राज्यभरातून या संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात न्यूज १८ लोकमतचे अँकर, व्हॉईस ऑफ मिडीया टिव्ही विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे यांचे डिजीटल माध्यमे तारक की मारक या विषयावर मार्गदर्शन केले. एबीपी माझाचे डिजीटल संपादक मेघराज पाटील यांचे डिजीटल मिडीया काल, आज आणि उद्याया विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात सामाजिक संशोधक रेणुका कड यांचे आंतरराष्ट्रीय स्थिती आणि डिजिटल मीडिया समोरील आवहाने या विषयावर मार्गदर्शन केले. नागपूर येथील डिजीटल मिडीया विषयाचे अभ्यासक देवनाथ गंडाटे यांचे डिजीटल मिडीया आणि पत्रकारिता या विषयावर प्रशिक्षणपर मार्गदर्शन करण्यात आले. यात पत्रकारांसाठी अनेक तज्ञांचे मार्गदर्शन झाले.
संमेलन यशस्वीतेसाठी संदीप मठपती, मल्लिकार्जून धारूरकर, संतोष सुर्यवंशी, बार्शी शाखेचे अध्यक्ष प्रदीप माळी, हर्षद लोहार, सागर गरड, शाम थोरात, विजय शिंगाडे, निलेश झिंगाडे, जमीर कुरेशी, ओंकार हिंगमिरे, मयूर थोरात, आस्लम काझी, प्रविण पावले, समाधान चव्हाण यांनी परिश्रम घेतले.