सीमा प्रश्नाच्या दाव्याबाबतच्या कामकाजास गती देण्यासाठी उपाययोजना कराव्यात – जयंत पाटील

मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीची बैठक पार…

मुंबई – महाराष्ट्र , कर्नाटक सीमावादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यासंदर्भातील कामकाजास गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना जलसंपदा मंत्री आणि तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिल्या.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठीच्या तज्ज्ञ समितीची आज बैठक पार पडली.

मंत्रालयातील परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा समितीच्या सदस्य सचिव सुजाता सौनिक, सदस्य ॲड. राम आपटे, दिनेश ओऊळकर, विशेष निमंत्रित ॲड. र. वि. पाटील, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड ॲड. शिवाजी जाधव, ॲड. संतोष काकडे आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबत पुर्वतयारी करावी. आवश्यक असल्यास ज्येष्ठ विधीज्ञ नियुक्त करावे. ज्येष्ठ विधीज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीतही बैठक घेण्यात यावी, अशी सूचनाही बैठकीत जयंत पाटील यांनी केली.

यावेळी बैठकीत ॲड. शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबतची वस्तुस्थिती सादर केली. सदस्य ॲड. र. वि. पाटील,दिनेश ओऊळकर,ॲड. राम आपटे यांनी आपली मते मांडली.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

Thu Jun 9 , 2022
मुंबई – बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी  अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत! कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांवर घरीच बसून शिक्षण घेण्याची वेळ आली. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असतानाही विद्यार्थ्यांनी जिद्द न हारता अभ्यास करून मिळविलेले यश अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.       बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांचे कारकीर्द ठरत असते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!