माथाडी कामगार नेते संजय निकम यांचा अनेक माथाडी कामगारांसह भाजपामध्ये प्रवेश

– भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले स्वागत

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाचे नेते संजय निकम व पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार युनियनच्या अनेक माथाडी कामगारांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात गोपाळ समाजहित महासंघ अध्यक्ष संजय गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्यासाठी निकम, गव्हाणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. देव, देश, धर्म तसेच हिंदुत्व रक्षणासाठी या सर्वांनी भाजपाला साथ देण्याचा निश्चय केला. कामगार कल्याणाचे कार्य करणारी भारतीय जनता पार्टी नव्याने पक्षात आलेल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. निकम यांच्या प्रवेशामुळे 29 हजार माथाडी कामगारांची कुटुंबे भारतीय जनता पार्टी सोबत जोडली गेली आहेत. या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला नक्कीच फायदा होईल असेही ते म्हणाले.

चव्हाण म्हणाले की, कष्टकरी वर्गासाठी मोदी सरकारने काम केले आहे. फडणवीस सरकार माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी झटत आहे. आता गोपाळ समाज ही मुख्य प्रवाहात आला असून या कामगारांच्या सर्व समस्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवू असा शब्द त्यांनी दिला.

राज्य गोपाळ समाजहित महासंघाचे पदाधिकारी गजानन महाजन, बालाजी घोडके, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष विष्णू नवघरे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता लोणारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध, सीएसआर निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tue Feb 25 , 2025
मुंबई :- आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) द्वारे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!