केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

मुंबई :- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे . रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे,असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये,माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते अभिषेक मिश्रा, ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते.

गोयल यांनी सांगितले की, देशभरात 12 इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहेत त्यात राज्यातील दिघी येथे उभ्या राहणाऱ्या इंडस्ट्रिअल पार्कचाही समावेश आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी 11 लाख कोटी एवढी विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. याचाही फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे.

2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्याचा निर्धार या अर्थसंकल्पातून प्रतीत होतो आहे असे सांगत गोयल यांनी या अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष वेधले. भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प असल्याने उद्योग क्षेत्रातून या अर्थसंकल्पाचे मोठे स्वागत करण्यात आले आहे. आणखी तीन वर्षांत भारताला जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने पाऊल टाकले आहे. शेती क्षेत्रासाठी 1 लाख 52 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असेही गोयल यांनी नमूद केले.

अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबद्दल शरद पवारांनी माफी मागावी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयाने तडीपार केले होते,अशी टिप्पण्णी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच केली होती. त्याबाबत बोलताना गोयल यांनी अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरवले होते,याकडे लक्ष वेधले. अमित शाह यांना गुंतविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. त्यावेळी शरद पवार सहभागी असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी चे (युपीए) सरकार केंद्रातील सत्तेत होते. त्यावेळच्या युपीए सरकारने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अमित शाह यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना निर्दोष ठरविल्यामुळे शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी,असेही गोयल म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor presents CSR Excellence Award to Nadir Godrej, PSUs

Sun Jul 28 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais presented the ‘Indian CSR Excellence Awards’ to the heads and CSR heads of various Corporates and Public Sector organisations for their work under CSR at Raj Bhavan Mumbai on Sat (27 July). The awards function was organised by ‘Indian CSR One Decade Celebration Committee’. Nobel Laureate Kailash Satyarthi, Chairman of the Indian CSR One […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!