संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– खोटे नाटे दस्तावेज जोडून करताहेत शासनाची दिशाभूल
कामठी :- कामठी तहसील कार्यालय मार्फत शासनाच्या संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,वृद्धपकाळ सहायता योजने अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मासिक सहायता अनुदान दिला जात आहे.योजनेसाठी पात्र होण्याकरिता आवश्यक असलेले कागदपत्र अर्जासोबत जोडून तहसील कार्यालयात जमा करून योजनेचा लाभ घेता येतो परंतु कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील कित्येक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे नाटे दस्तावेज जोडून शासनाची दिशाभूल करण्याचे कारस्थान केले आहे. वास्तविकता या योजनेचे बहुतांश लाभार्थी खोट्या पद्धतीने लाभ घेत आहेत मात्र हे सगळं उघड असले तरी संबंधित तहसील प्रशासनाच्या कृपा दृष्टीमुळे सगळे आलबेल असून शासनाच्या नोकरदाराकडूनच खोट्या लाभार्थ्यांना लाभ देऊन शासनाचा विश्वासघात करीत असल्याने या निराधार योजनेत मोठा भ्रष्टाचार दडलेला आहे.
बाहेरून खोटे नाटे दस्तावेज तयार करून दलालामार्फत अर्जाचो पोच करून शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसूल चोरी करीत आहेत याला सर्वस्वी जवाबदार संबंधित शासकीय अधिकारी आहेत. शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसूल चोरी करणाऱ्या मध्ये कोण कोण सहभागी आहेत?याकडे दुर्लक्षित धोरणामुळे याचा वरिष्ठ स्त्रावरून सखोल तपास होणे काळाची गरज आहे.सदर योजनेचे कामठी तालुक्यातील 22 हजार च्या जवळपास लाभार्थी असले तरी या संपूर्ण लाभार्थ्यापैकी जवळपास 15 टक्के लाभार्थी हे अवैध असल्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यानुसार लाखो रुपयांचा महसूल सर्रासपणे चोरी केल्या जात आहे.या सर्व प्रकारात लाभ मिळवून देणारे दलाल, दलालामार्फत खंडणीतील काही रक्कम त्या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना देऊन या योजनेचा खोटया लाभार्थ्यांना लाभ मिळवुन दिल्या जात आहेत.तेव्हा अशा खोट्या लाभार्थ्यांना रद्दबातल करीत योजनेच्या खोट्या लाभातून वगळून त्यांच्यावर कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी येथील सुजाण नागरिक करीत आहेत.