रुफ़टॉपसाठी महावितरणची जनजागृती

नागपूर :- नागपूरला सौर जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेत ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम हाती घेतले आहेत.

महावितरणच्या नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनीगुरुवरी खापा येथील राजेंद्र हायस्कूल आणि बडेगाव शाखा कार्यलायांतर्गत असलेल्या कोच्ची गावातील अभ्युदय विद्यालय येथील विद्यार्थी,, शिक्षक आणि पालकांना सौर रुफ़ टॉप योजनेची विस्तृत माहिती देत या योजनेचे फ़ायदे समजावून सांगितले. याशिवाय, गोंडेगाव ग्रामपंचायत कार्यालय, तेलकामठी शाखा कार्यालय, आंबेडकर चौक रामटेक, भिवापूर, कलमेश्वर, मौदा, खापा खापरखेडा, मोहपा नगर परिषद, येसंबा, सावरगाव यासोबतच नागपूर शहरांतर्गत बुटीबोरी, महाल, गांधीबाग, कॉग्रेसनगर, सिव्हील लाईन्स, येथेही संबंधीत कार्यकारी अभियंते आणि त्यांच्या सहका-यांनी ठिकठिकाणी सोलर रुफ़ टॉप संदर्भात ग्राहकांसोबतच महावितरण कर्मचा-यांचे देखील प्रबोधन केले.

जिल्ह्यातील अधिकाधिक घराच्या किंवा कार्यालयीन इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून त्याद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणुन ठिकठिकाणि जनजागृती कार्यक्रामचे आयोजन करण्यात येत आहे. रूफ टॉप सोलर सिस्टिममुळे घरगुती वीज ग्राहकांचे बिल कमी होते व कधी कधी ते शून्यही होते. छतावरील सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्समधून वीजनिर्मिती होते. ती वीज घरगुती कामासाठी वापरली जाते. त्यामुळे महावितरणकडून ग्राहकाला कमी वीज घ्यावी लागते व परिणामी बिल कमी होते. जर गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर जास्तीची शिल्लक वीज महावितरणला विकली जाते व त्याचा मोबदला ग्राहकाला मिळतो. हा मोबदला नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात नियमानुसार वीजबिलाच्या कपातीच्या स्वरुपात ग्राहकाला मिळतो. अशा रितीने रुफ टॉप सोलरचा घरगुती वीज ग्राहकांना मोफ़त ऊर्जेसोबतच निर्माण केलेल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून अतिरिक्त पैसे कमविणे, असा दुहेरी लाभ होत असल्याची माहिती या कार्यक्रमांच्या माह्यमातून दिल्या जात आहे.

रूफ टॉप सोलरचा खर्च वीजबिलातील सवलतीमुळे पाच ते सहा वर्षात वसूल होतो सर्वसाधारणपणे 25 वर्षे त्यातून वीजनिर्मिती होत राहते. याशिवाय स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर रूफ टॉप सोलरमुळे १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पात दररोज चार ते साडेचार युनिट वीजनिर्मिती होते. त्या प्रमाणात अधिक क्षमतेच्या प्रकल्पात अधिक वीज निर्माण होते. महावितरणच्या या प्रयत्नांना नागपुरकर वीज ग्राहकांनी सकारात्म प्रतिसाद देण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत असुन महावितरणच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी सोलर रुफ़ टॉप यंत्रणा बसविणा-या एजन्सी देखिल पुढाकार घेत ग्राहक जागृती मोहीमेत सहभाग नोंदवित आहेत. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. ग्राहकाच्या वीज आणि पैसे बचतीसोबतच पर्यावरण पुरक असलेल्या महावितरणच्या रुफ़ टॉप सोलरचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज बागडी, मिष्का तायडेला अजिंक्यपद, खासदार क्रीडा महोत्सव : लॉन टेनिस स्पर्धा

Fri Jan 26 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लॉन टेनिस स्पर्धेमध्ये राज बागडीने पुरूष एकेरीत तर मिष्का तायडेने मुलींच्या गटात अजिंक्यपद पटकाविण्याची कामगिरी केली. रामनगर टेनिस कोर्टवर पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मिष्का तायडेने मुलींच्या 16 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील अशा दोन गटात प्रतिस्पर्धकांना पराभूत करीत जेतेपदाचे दुहेरी मुकूट प्राप्त केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!