मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई

 नागपूर,ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (५ जानेवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४२९०९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९८,१३,५००/- चा दंड वसूल केला आहे.

          शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

          बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ११, धरमपेठ झोन अंतर्गत १, हनुमाननगर झोन अंतर्गत ४, नेहरुनगर झोन अंतर्गत ४, गांधीबाग झोन अंतर्गत ७, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १०, लकडगंज झोन अंतर्गत १३, आशीनगर झोन अंतर्गत १५ आणि मंगलवारी झोन अंतर्गत १ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३७४३९ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ८७ लक्ष १९ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

देसी अँप ‘कू’नं ओलांडला 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा, वर्षभरात केली 'ही' लक्षवेधी कामगिरी

Wed Jan 5 , 2022
5 जानेवारी 2022: भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’साठी 2021 हे अगदीच अविस्मरणीय वर्ष ठरले. 2 कोटी डाउनलोड्सचा टप्पा गाठत कू वेगाने वाढणारा भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय होतो आहे. ‘कू’चा बहुभाषिक मंच भारतीयांना मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी अवकाश मिळवून देतो. ‘कू’ने मागच्या वर्षभरात विविध पातळ्यांवर अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. त्याची ही झलक. 2 कोटी डाउनलोड्स डिसेंबर 2021 च्या मध्यावधीत ‘कू’ने 2 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!