मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

औरंगाबाद  :-  मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. मुक्तिसंग्रामाच्या देदीप्यमान इतिहासाचे अत्यंत प्रभावी दर्शन या प्रदर्शनातून होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या सहकार्याने आयोजित हे चार दिवसीय चित्र प्रदर्शन सिद्धार्थ उद्यान परिसरात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वित्त मंत्री डॉ. भागवत कराड,  आमदार संजय शिरसाट, अभिमन्यू पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जीएसटी विभागाचे आयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल आदी उपस्थ‍ित होते.

उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रदर्शनास नागरिक, विद्यार्थी, अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन निशुल्क असून मंगळवार, 20 सप्टेंबरपर्यंत सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेवा पुरविण्यात नागपूर जिल्हा देशात अव्वल ठरावा

Sun Sep 18 , 2022
लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आवाहन सेवा पंधरवडा :एकाच दिवशी 13 ठिकाणी शुभारंभ नागपूर  :-  बदलत्या तंत्रज्ञानाने पारदर्शिता वाढविली असून आता जनतेला अतिशीघ्र न्याय देण्याची भूमिका प्रशासनाची असली पाहिजे. त्यामुळे येत्या पंधरवड्यात नागपूर सेवा पुरविण्यात देशातला अव्वल जिल्हा ठरला पाहिजे. सोबतच ही प्रक्रिया यंत्रणेच्या कायमस्वरूपी अंगिभूत झाली पाहिजे, असा सूर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज व्यक्त केला. राज्यात आजपासून सामान्य नागरिकांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com