नागपूर : दि. ८ मार्च – राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या निमित्ताने ३ दिवसाचे विज्ञान आणि पर्यावरण जत्रेचे आयोजन दि. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान मराठी विज्ञान परिषद द्वारा भारती विद्यालय व क. महाविद्यालयात करण्यात
आले. विज्ञान जत्रेचे उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.आनंद मांजरखेडे व सचिव प्रा.अशोक भड यांनी केले. विज्ञान जत्रेच्या प्रथम दिवशी विज्ञान जत्रेचे संयोजक डॉ. त्र्यंबक बांदरे यांनी परिसरातील १०० झाडाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
डॉ.आनंद तट्टे व डॉ. सोनालिका भड यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. डॉ. राजकुमार खापेकर यांनी पाणी व पर्यावरण यावर माहिती दिली. विज्ञान जत्रेच्या दुसऱ्या दिवशी मोहन परसोडकर व रजनी बांदरे यांनी आपल्या देशाचा भूगोल व पर्यावरण यावर माहिती दिली. अनिता तोमर यांनी साधारण वस्तूचा वापर करून विज्ञानाचे विविध प्रयोग करून दाखविले. डॉ. सौ. शक्ती शर्मा यांनी पोषाहार व जीवन शैली यावर व्याख्यान दिले. विज्ञान जत्रेच्या अंतिम दिवशी डॉ. हरीश देशमुख यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग सादर केले. डॉ.चंद्रकांत मेहर यांनी देहदान चळवळीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. समारोप कार्यक्रमात प्राचार्य राजेश रेवतकर यांच्या उपस्थितीत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सोनालिका भड, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी डॉ. त्र्यंबक बांदरे, सौ. रजनी बांदरे, मेंढुले व नासरे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सौ.एल.पी.गोतमारे व सौ.एस.पी.बावनकर यांनी केले तर आभार प्रा.विनोद साखरकर यांनी मानले.