नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीने नागपूर अभियांत्रिकी संस्था माहुरझरी, ग्राम फेटरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नागपूर अभियांत्रिकी संस्था, माहुरझरी, फेटरीच्या वतीने नागपूर अभियांत्रिकी संस्था, माहुरझरी, फेटरी, नागपूरच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयदीप पांडे उपस्थित होते. नागपूर अभियांत्रिकी संस्थेचे प्राचार्य डॉ. पोटभरे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आनंद मांजरखेडे, लक्ष्मण निनावे, सेवानिवृत्त बँक अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वंयसेवक डॉ. प्रिती सावरकर, मुकुंद आडेवार उपस्थित होते.
न्या. जयदीप पांडे यांनी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाला नागपूर अभियांत्रिकी संस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी वृंद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभियांत्रिकी संस्थेच्या प्राध्यापिका शिल्पी यांनी केले.