मराठी भाषा मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम ची केली पाहणी

नवी दिल्ली :- मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.

21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. त्या निमित्ताने आज मराठी भाषा मंत्री सामंत यांनी या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, समन्वयक डॉक्टर शैलेश पगारिया तसेच त्यांचा चमू यावेळी उपस्थित होता.

येथे विविध महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार असणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव असणार आहे. तर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आले. तसेच सभागृह क्रमांक एकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव, तर सभागृह दोनला यशवंतराव चव्हाण त्यांचे नाव देण्यात येणार आहे. व्यासपीठाला स्व. काकासाहेब गाडगीळ आणि स्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची नावे असणार आहेत. जवळपास 4000 व्यक्तींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व सभागृहात होणार आहे अशी माहिती नहार यांनी सामंत यांना या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली.

पुणे येथून विशेष ट्रेन दिल्ली येथे 19 तारखेला सुटणार आहे या ट्रेनमध्येही साहित्यिक विषयक परिसंवाद तसेच कवी संमेलन चे आयोजन होणार असल्याची माहिती नहार यांनी सामंत यांना दिले. साहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे होणाऱ्या नियोजन कसे असणारे याचीही माहिती नहार यांनी सामंत यांना दिली. महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या साहित्य संमेलनाला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लायनेस क्लब यवतमाळच्या २०२५ वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ संपन्न

Thu Feb 13 , 2025
यवतमाळ :- लायनेस क्लब यवतमाळच्या २०२५ वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीचा भव्य पदग्रहण समारंभ हॉटेल ट्यूलिप येथे ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला मंचासीन मान्यवर म्हणून निवर्तमान क्लब अध्यक्षा डॉ. अंजली गवार्ले, सचिव अलका राऊत, मुख्य अतिथी माजी प्रांताध्यक्ष शोभा गट्टाणी, चंदा कोटेचा आणि इंस्टॉलेशन ऑफिसर माजी प्रांताध्यक्ष निलीमा मंत्री उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वज वंदन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!