राजधानीत ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा

नवी दिल्ली :- महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी पत्रकार दिन’ आज साजरा करण्यात आला.

उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या मराठी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवीन जीवनमुल्ये रूजविली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र शासन ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विधानभवन परिसरात 25 व 26 जानेवारीला ‘पुष्प प्रदर्शन’

Mon Jan 6 , 2025
Ø 10 जानेवारी पासून प्रवेश अर्ज उपलब्ध नागपूर :-  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्यान शाखेमार्फत 25 व 26 जानेवारी 2025 रोजी विधानभवन परिसरात 50 व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पुष्प प्रदर्शनात भाग घेण्यासाठी येत्या 10 जानेवारी पासून शासकीय रोपवाटिकेतून प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहे. या पुष्प प्रदर्शनात गुलाब व हंगामी फुले, कॅक्‌टस, सक्कुले, शोभिवंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!