“मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल. आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. आपले अर्ज, मागे घ्या ही सगळ्यांना विनंती करतो आहे.

आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरुच आहे. निवडणूक झाली की आपण पुन्हा आपला लढा देऊ. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही असं मनोज जरांगेंनी जाहीर केली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही मित्रपक्षांसह चर्चा करत होतो, लढणार होतो. आमचे मतदारसंघही ठरले होते. आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही. मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण हे सांगणार नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाज जर का एकटा लढला, तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा निवडून आणायचं त्यांना आणा. मात्र ज्याला निवडून आणायचं आहे त्यांच्याकडून लेखी घ्या. व्हिडीओही काढून घ्या. ” असंही आवाहन मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

एका जातीवर जिंकता येत नाही

एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असंही जरांगे यांनी सांगितलं.

माझ्यावर कुणीही दबाव टाकलेला नाही-जरांगे

महायुती आणि महाविकास आघाडी कुणाचाही दबाव नाही. कुणीही दबाव टाकला तर मी त्याच्या घरी जाऊन डोक्यात दगड घालेन असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही. मी बदलत नाही, बदलणार नाही. आम्ही तीन ते चार महिने अभ्यास केला होता. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहे. मी मनोज जरांगे एकटा नाही. तर मी म्हणजे आमचा पूर्ण समाज आहे असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

Credit by loksatta
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोल इंडिया स्थापना दिवस पर वेकोलि को दस पुरस्कारों से नवाजा गया

Mon Nov 4 , 2024
– कोल इंडिया मुख्यालय, कोलकता, में आयोजित स्थापना दिवस के कार्यक्रम में दिए गए अवार्ड नागपूर :- कोल इंडिया लिमिटेड के 50 वें स्थापना दिवस पर वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) को 06 कॉरपोरेट अवार्ड तथा 04 व्यक्तिगत उत्कृष्टता अवार्ड से सम्मानित किया गया। दिनांक 03 नवम्बर, 2024 को आयोजित स्थापना दिवस के कार्यक्रम में वेकोलि को सुरक्षा तथा समग्र परफॉरमेंस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com