संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सर्वेक्षण अचूक व परीपूर्ण होण्यासाठी कामठी तालुक्यातील प्रगणक व पर्यवेक्षक यांना दिले सर्वेक्षणाचे प्रशिक्षण
कामठी :- राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी कामठी तालुक्यातील आजनी येथील सभागृहात सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सर्वेक्षनांचे प्रशिक्षण दिले असून आज 23 जानेवारी पासून कामठी तालुक्यात प्रत्यक्ष सर्वेक्षणाला प्रारंभ झाला असून हे सर्वेक्षण 31 जानेवारी पर्यंत राहणार आहे. तेव्हा तालुक्यातील सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे .सर्वेक्षणासाठी प्रत्यक्ष घरोघरी येणाऱ्या प्रगणकाना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.