संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- मराठा सेवा संघ शाखा कन्हान व्दारे मा. जिल्हा पोलिस अधिक्षक नागपुर जिल्हा ग्रामिण यांना पोलीस निरिक्षक कन्हान मार्फत निवेदन देऊन प्रशांत कोरटकर रा. नागपुर या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ व जीवे मारण्याच्या धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशांत कोरटकर रा. नागपुर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व माँ साहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ साहेब जिजाऊ यांच्या बद्दल च्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिव प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समा जाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशिल आहे.
प्रशांत कोरटकर या व्यक्तीने संबंधित ऑडिओ कॉल मध्ये केलेले वक्तव्ये ही ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंद्रजित सावंत यांच्या वॉलवर उपलब्ध आहे. राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणा ची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर रा. नागपुर या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अट क करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास किंवा कारवाई करण्याबाबत गांभीर्य दाखवले नाही, तर सर्व शिवप्रेमींच्या वतीने राज्यभर तीव्र जन आंदोलन करून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या जातील, हे लक्षात घ्यावे. असे मराठा सेवा संघ शाखा कन्हान व्दारे जिल्हा पोलिस अधिक्षक नागपुर जिल्हा ग्रामिण हयांना राजेंद्र पाटील पोलीस निरिक्षक कन्हान मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. मराठा सेवा संघ शाखा कन्हान च्या शिष्ट्रमंडळात शिवश्री ताराचंद निंबाळकर, शांताराम जळते, मोतीराम रहाटे, संदीप कुकडे, विठ्ठल मानकर, चिंटु वाकुडकर, कमलसिंह यादव, प्रविण सतदेवे, दिवाकर इंगोले, शंकर कोंगे, नरेश मेहर, अमोल डेंगे, आंनद इंगोले, रजनिश मेश्राम, राकेश घोडमारे, अमोल देऊळ कर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.