मराठा लान्सर्सची विजयी सुरुवात, खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा

नागपूर :- मराठा लान्सर्स काटोल आणि खामला संघाने प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचा धक्का देत सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे सुरु असेलेल्या स्पर्धेत शनिवारी (ता. 13) महिला गटात मराठा लान्सर्स काटोल संघाने वायुसेना नगर संघाविरुद्ध हाफ टाइम मध्ये 16-12 अशी आघाडी घेतली व 23-12 अशा गुणफरकाने विजय नोंदविला.

पुरुषांच्या स्पर्धेत मराठा लान्सर्स खामला संघाने जय बजरंग क्रीडा मंडळ डेगमा संघावर 36-16 अशा मोठ्या फरकाने एकतर्फी विजय नोंदविला. मराठा लान्सर्स काटोल संघाने ओम अमर युवा पार्क नागपूर संघाला 50-13 ने मात दिली.

निकाल 

महिला 

1. गजानन क्रीडा मंडळ नागपूर मात साई राम क्रीडा मंडळ रामटेक 41-17 (24-7 हाफ टाइम)

विजेत्या संघाकडून मंगला ढवळे चे उत्कृष्ट प्रदर्शन

2. विद्यार्थी क्रीडा मंडळ रघुजी नगर मात समर्थ क्रीडा मंडळ नागपूर 33-23 (17-7) (साक्षी राखडेचे विजेत्या संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन)

3. गडचिरोली मात गजानन क्रीडा मंडळ हुडकेश्वर 22-14 (14-7)

4. मराठा लान्सर्स काटोल मात वायुसेना नगर नागपूर 23-12 (16-12)

5. त्रिरत्न कामठी मात विद्युत क्रीडा मंडळ मोहाडी 25-16 (6-13)

6. रेणुका क्रीडा मंडळ अजनी मात शिवछत्रपती क्रीडा मंडळ हिंगणघाट 31-23 (13-9)

पुरुष

1. मराठा लान्सर्स खामला मात जय बजरंग डेगमा हिंगणा 36-16 (22-4)

2. सुभाष क्रीडा मंडळ हिंगणघाट मात जय बजरंग काटोल 36-13 (15-14)

3. एकलव्य सावनेर मात संमती क्रीडा मंडळ नागपूर 30-10

4. मराठा लान्सर्स काटोल मात ओम अमर युवा पार्क नागपूर 50-13

5. भीमा देवी क्रीडा मंडळ भिवापूर मात गर्जना क्रीडा मंडळ वर्धा 31-30 (18-17)

6. साई राम रामटेक बरोबरी (drew) हनुमान क्रीडा मंडळ काटोल 31-31 (13-11)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांची १२ जानेवारी पासुन राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक

Sat Jan 13 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक भगिनी नी १२ जानेवारी पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला. असुन जोपर्यंत मंजुर केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय निघणार नाही तो पर्यंत संप चालु राहणार आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका व प्रवर्तक भगिनींनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ मध्ये २३ दिवसाचा संप केला. तेव्हा आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, सचिव, आयुक्त यांच्यासोबत संपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com