संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नागपूर, जिल्हाधिकारी मार्फत सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन
कामठी :- मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयासाठी अन्यायकारक असलेल्या या निर्णयाला आम्हा तेली समाजाचा विरोध आहे तरी असाधारण क्रमांक ४९ महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम विमूक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम २००० दिनांक २६ जानेवारी २०२४ या अधिसूचनेच्या मसुद्याला हरकत असल्याने हा अधिसुचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा अशी विनंती देखील सादर निवेदनातून करण्यात आली.
याप्रसंगी सर्वश्री कमलाकर घाटोळे, ईश्वर बाळबुधे, प्रा रमेश पिसे, हरिकीशन हटवार, शैलेश थोराने, संजय भलमे, नरहरी सुपारे, कमलाकर राजूरकर, अतुल मदनकर, अतुल बाळबुधे, मिरा मदनकर, धर्मेंद्र खमेले, अभिनव कटरे,अजय कनोजे,रवि होले, संजय रेवतकर सह तेली समाज संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.