मुंबई :- उद्धव ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पलांडे, नीरा बाजार समितीचे संचालक भानुकाका जगताप यांच्यासह पुणे जिल्ह्यातील उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या सर्वांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेंद्र खांडरे, शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, आशा बुचके, अतुल देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गरीब कल्याण कार्यक्रमामुळे , विकास योजनांमुळे देशाची वेगाने प्रगती होत आहे. देशाची मान जगात उंचावली आहे. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात शिंदे – फडणवीस सरकार या डबल इंजिनमुळे महाराष्ट्राचाही विकास वेगाने होत आहे. यामुळेच भाजपा मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य मान राखला जाईल, असेही ते म्हणाले.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी आमदार कै. नारायण पवार यांच्या कन्या प्रिया पवार, राष्ट्रवादीचे माजी सासवड शहर अध्यक्ष संतोष जगताप, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख रवींद्र गायकवाड, आंबेगाव तालुका प्रमुख समाधान डोके, गणेश सांडभोर, युवा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप देवकर, प्रदिप जगताप,दादा खर्डे,मारुती शेठ शेळके, बबनराव दौडकर नामदेव पानसरे आदींचा समावेश आहे.