विद्युत देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना अनेक पर्याय

– नियमित वीजबिलांचा भरणा करा; कटू कारवाई टाळा

नागपूर :- थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फे आक्रमकतेने राबविली जात असून येणा-या सुट्ट्यांचा काळ बघता वीजबिलाचा भरणा कसा करायचा असा यक्षप्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत आहे. ग्राहकांच्या या चिंतेचे निराकरण महावितरणने फार पूर्वीपासून केले आहे. महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाईन पर्यायांचा वापर करून नियमित वीजबिलांचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पारंपारिक वीजबिल भरणा केंद्राच्या अनेक मर्यादा असतात, ही केंद्रे शासकीय सुटीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतर बंद असतात यावर पर्याय म्हणून महावितरणचे 24 तास सुरु असलेले महावितरण मोबाईल ॲप हे यातील सर्वाधिक सशक्त पर्याय आहे. राज्यातील लाखो वीजग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरु केला आहे. यामुळे मोबाईल ॲपमुळे महावितरणची ग्राहकसेवा एका क्लिक्वर उपलब्ध झाली आहे. याशिवाय महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरुनही ऑनलाईन वीज बिल भरणा करण्याची सुविधा आहे. सोबतच युपीआय, विविध पेमेंट वॉलेट्स ॲपच्या सहाय्याने देखील वीजबिलचा भरणा सहजरित्या करणे शक्य आहे.

कृषी वर्गवारीचे ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीच्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा नियमितपणे वीजदेयके दिली जातात, मात्र काही कारणास्तव ग्राहकाला वीज बिल उपलब्ध न झाल्यास चिंता न करता इतर पर्यायी सुविधा दिल्या आहेत. यामध्ये ग्राहकाने संबधित उपविभागीय कार्यालयामध्ये वा शहरी भागामध्ये मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र येथे ग्राहक क्रमांक दिल्यानंतर वीज देयकाची दुसरी प्रत त्यांना तात्काळ मिळेल तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर आणि महावितरणच्या मोबाईल ॲपवरही वीजदेयके पाहण्याची सोबतच भरणा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुद्धा 24 x 7 उपलब्ध आहे. सोबतच महावितरणकडे ज्या ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदविले आहे.

त्यांना वीजदेयके निर्मित होताच त्याचा एसएमएस.(संदेश) त्यांच्या मोबाईलवर मिळत आहे. हा एसएमएस महावितरणच्या वा खासगी वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून देयकाचा भरणा करता येतो. याशिवाय ज्या ग्राहकांकडे मोबाईल ॲप नाही त्यांच्याकरिता महावितरणच्या वीज बिलावर ‘क्युआर’ (क्यूक रिसापॉन्स) कोड देण्यात आला असून मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाउनलोड केलेल्या ‘क्युआर’ कोड रीडरच्या माध्यमातून वीजबिलावरील हा कोड स्कॅन करता येतो. त्यावरून महावितरणची मोबाईल ॲपची लिंकही मिळते. वीजबिलावरील ‘क्युआर’ कोड हा अँड्राइड, आयओएस, विंडोज मोबाईलसाठी उपलब्ध आहे.

थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल नोटीस थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी भारतीय विद्युत कायदा 2003 मधील कलम 56 नुसार डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अॅप एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करता येते. यामुळे ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा नियमित भरणा करुन कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठाच्यावतीने ‘रोबोटिक्स’ विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Tue Sep 12 , 2023
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ, विद्यापीठ रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन आणि एम.डी.बी. इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा.लि. यांचे संयुक्त विद्यमाने ‘रोबोटिक्स’ विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी अमरावतीकरीता नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ येथे, दि. 16 सप्टेंबर रोजी यवतमाळकरीता जगदंबा अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे, दि. 18 सप्टेंबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com