संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मोजकेच अधिकारी व कर्मचारी घालतात ओळखपत्र
कामठी :- कामठी तालुक्यातील तहसील कार्यालय,पंचायत समिती, नगर परिषद, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, भूमी अभिलेख,सार्वजनिक बांधकाम विभाग,नोंदणी कार्यालय तसेच इतर शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेवर असताना गळ्यात आपले ओळखपत्र ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आपले ओळखपत्र दिसेल याप्रमाणे परिधान करावे असे आदेश असताना देखील यासह कर्मचाऱ्यांना आपल्या टेबलावर आपली नेमप्लेट (नावाची पाटी)देखील असणे आवश्यक आहे.
शासनाने याबाबतचे आदेश बजावले असून त्याची अंमलबजावणी प्रत्येक शासकीय विभागाकडून केली जात आहे असे दिसून येत नाही त्यामुळे कामठी तालुक्यातील अनेक शासकीय अधिकारी,कर्मचारी ओळ्खपत्राविना दिसताहेत.
तालुकादर्जाप्राप्त कामठी शहरात विविध मुख्य शासकीय कार्यालये असून कामानिमित्त या सर्व शासकीय कार्यालयात नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात असते.येथील तहसील,नगर परिषद,पंचायत समिती ,सार्वजनिक बांधकाम,आरोग्य विभाग,महसूल,ग्रामपंचायत आदीकार्यालयात सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामासाठी तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येत असतात मात्र कार्यालयात आल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्यास योजनेबाबत विचारल्यास ते इतर ठिकाणी बोट करतात पण नेमके कोणाकडे जावे हे लोकांना समजतच नाही .प्रत्येक टेबलावर एखादी व्यक्ती बसलेली असतेच त्यामुळे एका टेबलवरून दृसऱ्या टेबलाकडे लोकांना संबंधित योजनेचा लाभ घेण्याकरिता अधिकाऱ्याचा शोध घेत फिरावे लागते .ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने आता कर्मचाऱ्यांना ओळखपत्रची सक्ती केली होती तसेच टेबलावर देखील नावाची पाटी लावण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या टेबलावर आता पाटी ठेवणे तसेच गळ्यात शासकीय ओळखपत्र परिधान करणे हे बंधनकारक आहे मात्र शासनाच्या या आदेशाची सर्रास अवहेलना करण्यात येत असून बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी कर्मचारी या आदेशाची अंमलबजावणी कारताना दिसतात.
शासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला तसेच अधिकाऱ्याला शासकीय ओळखपत्र दिले जाते मात्र असे ओळखपत्र कर्मचारी आणि अधिकारी आपल्या पर्समध्येच ठेवून देतात केवळ फक्त शासकीय कार्यालयातील कामासाठी किंवा वाहतूक पोलिसांनी अडवणूक केल्या नंतरच शासकीय कर्मचारी असल्याची बतावणी करण्यासाठी या ओळ्खपत्राचा वापर होताना दिसत आहे.तेव्हा शासकीय आदेशानुसार शासकोय कर्मचाऱ्यानी शासकीय सेवेच्या काळात आपले शासकीय ओळखपत्र गळ्यात घालावे जेणेकरून नागरिकांना देखील आपल्या कामासाठी कार्यालयात गेंल्यानंतर कर्मचाऱ्याचा शोध घेण्यास सोपे होईल.