परभणी जिल्ह्यातील उबाठा, शरद पवार गटाच्या अनेक नेते, कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई :- परभणी जिल्ह्यातील पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे, पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण कोल्हे, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी देसाई यांच्यासह उबाठा आणि शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे, असे भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

उबाठा आणि शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांच्या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल आणि संपूर्ण जिल्हा लवकरच भाजपामय होईल असा विश्वास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्यांमध्ये पूर्णा बाजार समितीचे उपसभापती नारायणराव पिसाळ, माजी उपसभापती लक्ष्मण बोबडे, संतराम ढोणे, रमेशराव काळबांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ सोळके, पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती माणिक घुंबरे, बालाजी डाखोरे यांचा समावेश आहे. यावेळी विविध सेवा सहकारी संस्थांच्या 60 अध्यक्षांनी तर जिल्ह्यातील 40 सरपंचांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैद्यरित्या रेती चोरी करताना ट्रक्टर ट्रॉली पकडुन दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

Wed Apr 2 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करता ना ट्रक्टर ट्रॉली पकडुन तीन लाख तीन हजाराचा मुद्दे माल जप्त करित दोन आरोपी विरूध्द कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार वाई उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान पथकानी केली. सोमवार (दि.३१) मार्च ला संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान हे त्यांच्या पथकासह कन्हान पोलीस स्टेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!