रिकाॅर्डिंग डांस पाहायला गेलेल्या ईसमाला चाकु ने दोन घाव मारून केले गंभीर जख्मी

कन्हान पोस्टे ला तीन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, आरोपीना अटक. 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस सात किमी अंतरावर असलेल्या बोरडा (गणेशी) येथे रिकॉर्डींग डान्स प्रोग्राम पाहायला गेलेल्या ईसमाला दिड महिण्यापुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आणि हटकल्याच्या रागाने तीन आरोपींतानी संगमत करुन हातबुक्याने व पोटावर चाकु ने दोन वार करुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी अतुल मदनकर यांच्या तक्रारीने पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करीत तीन आरोपींना अटक करून पुढील तपास सुरु आहे.

प्राप्त माहिती नुसार दिड महिण्याअगोदर सुनिल गजभिये यांच्या घरच्या लग्णाच्या फिरत्या वरातीत अतुल चिंतामन मदनकर वय २९ वर्ष रा. निमखेडा यांच्या मोठ्या वडिलांच्या घरासमोरुन डि.जे. वाजत जात असतांना डि.जे चा टॉप साउंड बॉक्स चालल्या गाडीतुन गावातील दोन मुले व अतुल यांच्या भावाचा मुलगा तेजस ह्याच्या अंगावर पडल्याने त्यांना मार लागला होता. तेव्हा डि.जे. मालक अभिषेक महले रा. बोरडा यांच्याशी तोडा तोंडी भांडण झाल्याने त्याचे विरोधात रामटेक पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांच्या वर कार्यवाही करण्यात आली होती. सोमवार (दि.३०) जानेवारी ला बोरडा गावात कुस्तीची आम दंगल व रिकाॅर्डिंग डान्स असल्याने अतुल मदनकर व त्यांचा मोठा मुलगा विलास मदनकर दोघे बोरडा येथे रात्री ९ वाजता रिकॉर्डींग डांस चा प्रोग्राम पाहण्यास आले असता रात्री १० वाजता कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम पाहत असतांना लोकांची खुप गर्दी जमली होती. सोमवार मध्यरात्री व मंगळवार (दि.३१) जानेवारी ला रात्री १ वाजता दरम्यान स्टेजच्या बाजुला असलेल्या लोकांच्या गर्दीला बोरडा येथील काही इसम बाजुला करीत असतांना अभिषेक महल्ले ह्याने अतुल यांच्या गावातील अशोक भलावी यास ढक्कल ढुक्क ल करुन गालावर थापळीने मारल्याने अतुल याने त्यास कश्याला मारला असे म्हटले असता अभिषेक नरेंद्र महल्ले व त्याचे भाऊजी आकाश गुणवंता तिजारे आणि त्याचा भाऊ विकास गुणवंता तिजारे तीनही रा. बोरडा (गणेशी) यांनी अतुल ला गर्दीतुन बाहेर ढकलत रोडच्या बाजुला शेतात नेऊन हात बुक्याने मारत असतांना अतुल याने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत असता आकाश तिजारे याने आपल्या जवळील चाकु ने अतुलला जिवे मारण्याच्या उद्देशाने उजव्या कुशीत पोटाच्या बाजुला दोन घाव मारून गंभीर जख्मी केले. तेव्हा अतुल स्वत:ला वाचविण्याकरिता पडुन गेल्याने रस्त्यात अतुल ला विलास मदनकर भेटला आणि त्याचे गाडीवर बसुन अतुल निमखेडा गावी गेला. त्यानंतर अतुल हा आपल्या लहान भाऊ पवन मदनकर, अनिल मदनकर यांचे सह पोलीस स्टेशन ला तक्रार करण्यास आले.

अभिषेक महल्ले यांच्या सोबत दिड महिण्यापुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून व काल रात्री रिकॉ र्डिंग डांस च्या कार्यक्रमात अशोक भलावी स ढक्कल ढुक्कल केल्याने हटकल्याच्या रागावरून अभिषेक महल्ले, आकाश तिजारे, विकास तिजारे यांनी अतुल ला कार्यक्रमातून बाहेर ढकलत नेऊन हाथ बुक्याने मारून आणि चाकु ने जिवे मारण्याचा उद्देशाने वार करुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्या दी अतुल मदनकर यांचे तक्रारीने पोस्टे ला आरोपी अभिषेक महल्ले, आकाश तिजारे, विकास तिजारे यांच्या विरुद्ध कलम ३०७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक करुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले, प्रशांत रंगारी हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सशस्त्र सीमा बल के निवृत्त उपमहानिरीक्षक डाॅ. मिलिंद वासे का किया सम्मान

Wed Feb 1 , 2023
नागपुर:- हाल ही में अरिहंत पब्लिक स्कूल खरबी रोड वाठोडा नागपुर के प्रांगण मे आयोजित समारोह मे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) गृह मंत्रालय नई दिल्ली के सेवानिवृत्त उपमहानिरीक्षक डाॅ. मिलिंद वासे का सम्मान किया गया. डाॅ मिलिंद वासे को उनके सेवा काल मे महामहिम राष्ट्रपति भारत सरकार द्वारा इंडियन पुलिस पदक 2013, प्रेसिडेंट पुलिस पदक 2019 तथा अतिविशिष्ट सेवा आंतरिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com