संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जे पी नगर येथील एका भंगार दुकानात काम करणाऱ्या एका मजुराच्या डाव्या पायाला एका विषारी सापाने सर्पदंश केल्याची घटना काल सायंकाळी 6 वाजता घडली असून वेळीच औषधोपचार मिळाल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. सर्पदंशाने जख्मि झालेल्या इसमाचे नाव कैलाश अहिले वय 38 वर्षे रा कामठी असे आहे.
प्राप्त माहीती नुसार सदर जख्मि इसम नेहमीप्रमाणे भंगार दुकानात काम करीत असताना अचानक एका विषारी सापाने पायाला दंश केल्याच्या लक्षात येताच त्वरित मदतीची धाव घेत सदर जख्मिला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.त्यानंतर पुढील उपचारार्थ नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने जीवितहानी टळली.