संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील दोन दिवसात वातावरणात बदल झाला अचानक वादळी पाऊस पडतोय याच वातावरणात काल 9 एप्रिल ला कामठी तालुक्यातील बोरगाव गावात अचानक सोसाट्याचा वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला व त्यातच जोरात वीज कडाडून शेतात बकऱ्या चरायला गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर पडल्याने सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी चार दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव कैलाश गोपाल प्रगट वय 42 वर्षे रा बोरगाव तालुका कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच तहसील प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणी साठी मृतदेह श्वविच्छेदनगृहात हलविण्यात आले.मृतक हा घरचा कर्ता व्यक्ती असल्याने वीज पडून मृत्यू झाल्याने मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मृतकाच्या पाठीमागे पत्नी व तीन मुली आहेत.