संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ रहिवासी इसमाचा झोपेतच अकस्मात मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी अडीच वाजता घडली असून मृतकाचे नाव जितेंद्र प्रेमणारायन सोनी वय 54 वर्षे रा शिवली बौद्ध विहार जवळ ,रामगढ कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा काही वर्षोपूर्वी कामठी रेल्वे स्टेशन जवळ रिक्षाचालक म्हणून कार्यरत होता.पत्नीशी होत असलेल्या वैवाहिक कलहाला कंटाळून सदर मृतकाची पत्नी मागील चार वर्षापूर्वीच पतीपासून दूर राहायची तर मृतक हा एकटाच वास्तव्यास होता.काल दुपारी घरी येऊन आतून दार बंद करून झोपी गेला असता बराच वेळ होऊन घराबाहेर न पडल्याने नागरिकांनी शंका कुशंका व्यक्त करीत सदर मृतकाच्या मुलाने डोकावून बघितले असता बाप झोपेतच मृतावस्थेत आढळला.यासंदर्भात त्वरित नवीन कामठी पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नसून पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे तर शवविच्छेदन अहवाला नंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.मृतकाच्या कुटुंबात पत्नी,2 मुले व 2 मुली असा आप्तपरिवार आहे.