संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आपल्याकडे शहाण्याला शब्दाचा मार असे म्हटले जाते .बऱ्याच वेळा शहाण्याकडून व सज्जनांकडून सांगण्यात येते की ,सज्जन माणसाला शाब्दिक अपमानही मृत्यूसारखाच असतो त्यामुळे कुणीही कधीही कुणाचा अपमान न करता प्रत्येकाने प्रत्येकासोबत विचारपूर्वक बोलावे व वागावे कारण सज्जन व्यक्तीचा केलेला अपमान हा त्याच्या जिव्हारी लागू शकतो असा सल्ला नेहमी सज्जन व प्रबोधनकार व्यक्तीकडून देण्यात येतो. मनुष्य हा इतर सर्व प्राण्याहून श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारची सुख साधने आज त्याच्याबरोबर हात जोडून उभे आहेत पण या साक्षर व आधुनिक युगात माणसाचे जीवन खरंच सुखी व संपन्न आहे काय? समाजात सुशिक्षित पण अविचारी अशी अनेक माणसे आहेत जे क्षुल्लक कारणासाठी घरच्यांचा किंवा इतरांचा शाब्दिक अपमान करताना दिसतात म्हणूनच या साक्षर आधुनिक युगात माणूस सुशिक्षित झाला पण सुसंस्कृत झाला काय?अशी कल्पना डोक्यात येते.असे मत समाजसेवक सुनील बडोले यांनी आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमात व्यक्त केले.
समाजात कुटुंबात वावरताना माणूसच माणसाचा अपमान करताना त्याला धोका देत असल्याचे अनेक उदाहरणे पाहण्यात येते त्यामुळे या आधुनिक साक्षर युगात समाजातून मांणसातून माणुसकीचा झरा पूर्ण आटून गेल्याचे चित्र निदर्शसनास येत आहे.
केवळ पैश्यासाठी व क्षुल्लक कारणासाठी रक्ताची अतूट नाती लटालट तोडली जात आहेत यामुळे व्यक्तीत नकारात्मक भावना निर्माण होते .कुणालाही घालून पाडून बोलने म्हणजे त्याचा अपमान करणेच होय. सज्जन थोर माणसाच्या मते शब्दांचा मार हा एखाद्या जोरदार थापडा सारखाच वेदनादायी असतो त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो त्यांच्या मते कटू शब्दांचा आपल्या जीवनावर बराच प्रभाव पडतो. शब्दांनी केलेला मौखिक अपमान गालावर मारलेल्या थापडी सारखाच असतो त्यामुळे आपल्या डोक्यात नकारात्मक भावना निर्माण होतात.
अपमान हा आपल्या स्वतःच्या विरुद्ध असतो आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी धोकादायक असतो तो आपल्या अंतःकरणात दीर्घकाळ टिकून राहतो म्हणूनच सज्जनाच्या मते माणसाने माणूस बनुनच राहावं व माणसासारखं वागावं , बोलावं कारण या साक्षर युगात कुणाचाही शाब्दिक अपमान करणे म्हणजे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे होय.