नागपूर :- सर्व परवानग्या व तयारी पूर्ण असताना राजकीय दबावात येवून आजपर्यंत सुरू न झालेल्या मेट्रोसाठी नागपूर शहर मनसे ने महामेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांना शहर अध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे व शहर सचिव महेश जोशी यांच्या स्वाक्षरीने निवेदनाद्वारे निर्वाणीचा इशारा दिला.
चर्चे दरम्यान नागपूर शहरातील काही मेट्रो स्थानके सोडली तर संपूर्ण मेट्रोचे जाळे पूर्ण झाले असून जनतेसाठी सर्व मार्गिका कार्यान्वित करता येणे सहज शक्य असताना, सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक तसेच कस्तुरचंद पार्क ते पारडी स्थानकादरम्यान फायद्यात असलेली मेट्रो मार्गिका बंद ठेवण्यात आल्याबाबत खेद व्यक्त करून सद्य स्थितीत नागपूर मेट्रो मोठया प्रमाणात नुकसान सहन करीत असताना राजकीय दबावात येवून फायद्यात असलेली मेट्रो सेवा कार्यान्वित न करणे ही नागपूर जनतेची निव्वळ फसवणूक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्रवासी संख्या जास्त असणाऱ्या फायद्यातील मार्गिका बर्डी ते पारडी व बर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक सर्वप्रथम पूर्ण करून पूर्ण क्षमतेने सुरु करणे संयुक्तिक असताना तसे न करता राजकीय अट्टाहास, राजकीय दबाव तसेच त्यावेळी येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागपूर मधील एका वजनदार केंद्रीय मंत्र्याच्या दबावातून नुकसान होणाऱ्या खापरी ते बर्डी व हिंगणा ते बर्डी मार्गिकांचे प्रधामंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे घाईघाईने सर्वप्रथम उद्घाटन करून सुरू करणे ही नागपूर जनतेची दिशाभूल होते असे खेदाने नमूद करण्यात आले. राजकीय आत्तहसमुळे नुकसानातील मेट्रो सेवा सुरू केल्याचे फलीत आज नागपूर मेट्रो मोठे नुकसान सहन करीत असल्याची जाणीव मनसे शिष्ठ मंडळाने व्यवस्थापकीय संचालकांना करून दिली.
मनसे पदाधिकारी मेट्रो बाबत पूर्ण महितीनिशी चर्चा करायला आले. त्यांना प्राप्त विश्वसनीय माहितीनुसार नागपूर मधील २ ते ३ स्टेशन्स वगळता बाकी संपूर्ण मेट्रोचे जाळे गेल्या ८ ते १० महिन्यांपासून तयार असून मेट्रो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून ही सेवा तात्काळ सुरू करणे सहज शक्य असताना नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याचे उद्घाटन टाळले जात असल्याची दुर्भाग्यपूर्ण बाब चर्चे दरम्यान मांडण्यात आली. “नागपूर मेट्रो” ही जनतेच्या सेवेसाठी बनविण्यात आलेले महामंडळ असून यात कोणताही राजकीय हस्तक्षेप अपेक्षित नसताना नागपूर शहरातील काही केंद्र व राज्य शासनातील मोठ्या मंत्र्याच्या दबावात व हस्तक्षेपात कार्य करीत आहे ज्याचे फलीत नागपूर शहरात मेट्रो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली बघावयास मिळात नाही हे अत्यंत खेदाने नमूद करण्यात आले.
नागपूर शहरात नागपूर जनतेसाठी मेट्रो सुरू करण्यात आल्यामुळे जनतेवर मेट्रो कर लागू करण्यात आला आहे. याचाच अर्थ, नागपूर शहरातील जनतेचा मेट्रो प्रकल्पात आर्थिक सहभाग आहे असे स्पष्ट करून सर्व कामे पूर्ण असताना तसेच विविध विभागातील सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या असताना नागपुरात मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकत नाही ह्या मागचे खरे कारण कराचे ओझे वाहणाऱ्या नागपूरकर जनतेला कळलेच पाहिजे अशी मागणी व्यवस्थापकीय संचालकांना करून मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने येणाऱ्या १५ दिवसात सुरू झाली नाही तर मनसे ला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
निवेदनाद्वारे कोणत्याही दबावात न येता येणाऱ्या १० ते १५ दिवसात नागपूर मेट्रोच्या बाकी मर्गिकांचे तात्काळ उद्घाटन करून मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यात यावी व नागपूरकर जनतेला बहाल करून त्याचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली
जनहित विचारत घेवून मनसे शिष्ठ मंडळाने केलेली मागणी सकारात्मकतेने घेवून व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी याबाबत केंद्र व राज्य पातळीवर विषय मांडून येत्या १५ दिवसात मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने नागपूर जनतेला बहाल करण्याचे आश्वासन दिले.
शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे व शहर सचिव महेश जोशी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेले निवेदन व त्यावर झालेल्या चर्चेत शहर सचिव घनश्याम निखाडे, रजनीकांत जिचकार, श्याम पूनियानी, विभाग अध्यक्ष प्रशांत निकम, उमेश उतखेडे, अंकित झाडे, अभिषेक माहुरे, महिला पदाधिकारी मनिषा पापडकर व संगीता सोनटक्के, उपविभाग अध्यक्ष पराग विरखरे उपस्थित होते.