संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून शासन निर्णय काढण्याची मागणी नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष व कांग्रेस पदाधिकारी सुरेश भोयर यांनी केले आहे.
येथील आशा व गटप्रवर्तकांनी गेल्या 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपल्या मानधन वाढीसाठी तब्बल 23 दिवसाचा बेमुद्दत संप केला होता. या संपकाळात आशा व गटप्रवर्तकांनी सरकारचे लक्ष वेधुन घेण्यासाठी स्थानिक तसेच राज्य पातळीवर सुद्धा विविध प्रकारचे आंदोलने केलीत या दरम्यानच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री ना तानाजी सावंत यांनी संघटनेच्या कृतीसमितीच्या शिष्टमंडळात झालेल्या चर्चेत आशा वर्कर्स ला 7 हजार व गटप्रवर्तकाना 6 हजार 200 रुपयांची वाढ देण्यात येईल असे जाहीर केले.त्यानंतर गट प्रवर्तकांच्या मानधन वाढीत दुरुस्ती करून त्यांच्या मानधनात 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव सुद्धा मान्य करण्यात आला.या लिखित आश्वासनावर विश्वास ठेवून आशा व गटप्रवर्तकांनी आपला बेमुद्दत संप स्थगित केला.परंतु दोन महिने लोटूनही शासन निर्णय न काढल्याने आशा व गटप्रवर्तकांची सरकारने फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे. ज्यामुळे अशा व गटप्रवर्तकात मोठा असंतोष पसरला आहे.परिणामी मागील एक महिन्यापासून सर्व आशा वर्कर व गतप्रवर्तकांनी बेमुद्दत आंदोलन पुकारीत मुंबई च्या आझाद मैदानात मागण्यांच्या पूर्ततेसाठी ठिय्या बसल्या आहेत तेव्हा शासनाने आश्वासनांची पूर्तता करून शासन निर्णय काढावे अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले आहे.