महिला काँग्रेस करणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर :- रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी खोत सभागृह,महाल येथे नागपूर शहर महिला काँग्रेस वतीने खोत सभागृह , महाल नागपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे आयोजक ऍड. नंदा चंद्रभान पराते आहेत. या सत्कारात माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल व प्रमुख पाहुणे हे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतील.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमेश डांगे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते,अनिल आदमने,जयंत दळवी,प्रो. गजानन धांडे, माजी नगरसेवक झुल्फिकर भुट्टो, आईसा अन्सारी,कृष्णा गोटेफोडे,रमेश पुणेकर, राजू ताबूतवाले राहतील.

या कार्यक्रमात रचना डांगे ,संजना देशमुख, बाळू सातपुते, अंदाज वाघमारे, प्रकाश बांते ,वासुदेव वाकोडीकर हे प्रामुख्याने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा सत्कार करतील .

महिला काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी दुपारी १ वाजता खोत सभागृह, महाल येथे होईल असे नागपूर शहर महिला काँग्रेस या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष ऍड. नंदा चंद्रभान पराते यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बूटी कन्या शाळा बेघर निवारा केंद्रात महिला निवाऱ्याची क्षमता वाढणार, मनपा आयुक्तांनी केली पाहणी

Sat Jul 13 , 2024
– बेघरांशी साधला संवाद नागपूर :- नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग, समाजोपयोगी उपक्रम अंतर्गत सीताबर्डी येथे बूटी कन्या शाळेमध्ये आधार शहरी बेघर निवारा केंद्र संचालित करण्यात येत आहे. या निवारा केंद्रामध्ये जास्तीत जास्त बेघर महिलांना निवारा मिळावा यासाठी महिला निवाऱ्याची क्षमता वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. शुक्रवारी (ता.१२) मनपा आयुक्तांनी सीताबर्डी मार्केट लगतच्या आधार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com