महिला काँग्रेसने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर :- नागपुरात महाल येथील खोत सभागृह मध्ये नागपूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ ,भगवान बिरसा मुंडा , महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रास मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी माल्यपर्ण करून अभिवादन केले.या कार्यक्रमात माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते, अनिल आदमने, जयंत दळवी, प्रो. गजानन धांडे, माजी नगरसेवक झुल्फिकर भुट्टो, कृष्णा गोटेफोडे, रचना डांगे ,संजना देशमुख, उमराव खरबीकर,बाळू सातपुते, अंदाज वाघमारे, प्रकाश साळुंखे, नसीम अनवर, वासुदेव वाकोडीकर यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

नागपूर शहर महिला काँग्रेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थांना जीवनात संघर्ष करूनच यशस्वी व्हावे लागेल म्हणून अथक परिश्रम करण्याची तय्यारी ठेवावी आणि विद्यार्थांनी महापुरूषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कठीण परिस्थितीतही मार्ग शोधण्यासाठी चांगले गुण जोपासून भविष्यामध्ये कठोर परिश्रम करावे,असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी वाईट परिस्थितीतही समोर जाण्याची हिंमत ठेवावी असे आवाहन याप्रसंगी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाधर बांधेकर,प्रशांत बुरडे,बबन हेडाऊ,प्रकाश दुलेवाले, शकुंतला वट्टीघरे,माया धार्मिक,मंजू पराते, मंदा शेंडेयांनी अथक परिश्रम केले तर शहर महिला काँग्रेसच्यावतीने झालेल्या सत्कार कार्यक्रमाचे संचालन जयश्री धार्मिक तर आभार प्रदर्शन फालगुनी पराते यांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निःशुल्क योग शिबिराचे आयोजन १७ जुलै पासून

Mon Jul 15 , 2024
नागपूर :- सुख शांती समाधान संस्थेच्या वतीने १७ जुलै ते ३१ जुलै पर्यंत रोज सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत योगा शिबिराचे आयोजन जुना नांदा तथागत बुद्ध विहार लोन खैरी रोड कोराडी येथे करण्यात आले आहे. या शिबिरात आसन, प्राणायाम, ओंकार तसेच वेग वेगळ्या आजरानुसार ही आसन प्रात्यक्षिकासह शिकविल्या जातात. या शिवाय व्यक्तिमत्त्व विकास कसा साधायचा सुप्त गुणांना जागृत करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com