नागपूर :- राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना वरिष्ठ कोषगार कार्यालय नागपूर अंतर्गत माहे फेब्रुवारी 2023 चे निवृत्तीवेतन 6 मार्च नंतर अदा करण्यात येईल असे अप्पर कोषगार अधिकारी सतिश गोसावी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
आयकर प्राप्त निवृत्तीवेतन धारकांची आयकराची परिगणना पुन:श्च सुधारीत करून आयकराचा अंतिम हप्ता फेब्रुवारी 2023 च्या निवृत्तीवेतनातून कपात करण्यात येणार आहे, ते वेतन प्रणालीमध्ये समाविष्ठ करून अंतिम करण्याची कार्यवाही कोषागार स्तरावर सुरू आहे. तसेच दिनांक 4 व 5 मार्च 2023 रोजी शासकीय सुट्टी असल्याने निवृत्तीवेतन प्रदान हे 6 मार्च नंतर संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल याची सर्व निवृत्तीवेतन आणि कुटूंबवेतन धारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वरिष्ठ कोषगार अधिकारी नागपूर यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
@ फाईल फोटो