महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू

नागपूर :- वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. एक जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व ग्राहकांनी या योजनेचा लाभघेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नागपूर परिमंडलात अद्यापही घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सुमारे चौदा लाख ग्राहकांपैकी केवळ नऊ लाख ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरत आहेत. उरलेल्या ग्राहकांनाही रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘महावितरण’ने ही अनोखी बक्षीस योजना आणली आहे. वीजबिल ऑनलाइन भरण्यासाठी ‘महावितरण’ ने संकेतस्थळ, मोबाइल अॅप उपलब्ध करून दिलेले आहे. ग्राहकांना देय रकमेवर 0.25 टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते.

ऑफलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांनी पहिल्यांदाच ऑनलाइन बिल भरल्यावर त्यांना स्क्रिनवर गो-ग्रीनची पॉप-अप दिसणार आहे. गो-ग्रीन योजनेत ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एकरकमी 120 रुपये सूट दिली जाईल. गो-ग्रीनमध्ये पुढील प्रत्येक ग्राहकाला ई-मेल व मोबाइलवर मिळेल. त्यामुळे ग्राहकाला एक टक्का प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटही मिळवता येते.

महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून 2025 या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाइन पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीजबिल भरणे आवश्यक आहे. वीजबिल भरणा केलेली रक्कम किमान 100 रुपयांच्यावर असायला हवी. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम 10 रुपयांपेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र राहील.

नागपूर परिमंडलात जानेवारी महिन्यात 14 लाख 79 हजार 537 ग्राहकांनी 197 कोटी 49 लाख रुपयांची वीजबिले ऑनलाइन भरली आहेत. ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच ‘महावितरण’च्या मोबाइल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही कितीही रकमेचे वीजबिल ऑनलाइन भरता येते. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीजबिल भरण्यास कसलेही शुल्क लागत नाही. वीजबिलांचे ऑनलाइन पेमेंट अत्यंत सुरक्षित असून, त्यास रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-2007 च्या तरतूदी लागू आहेत.

वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यावर ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

लकी डिजिटल ग्राहक योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी एक एप्रिल 2024 पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत एकदाही वीजबिल भरलेले नाही किंवा वीजबिल ऑनलाइन भरलेले नाही. 31 मार्च 2024 नंतर सलग तीन वेळा वीजबिल ऑनलाइन भरणारे सर्व लघुदाब वीजग्राहक योजनेसाठी पात्र ठरणार आहेत

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Central Railway, Nagpur Division Intensifies Drive Against Unauthorized Vendors

Fri Feb 28 , 2025
Nagpur :-In a sustained effort to enhance passenger safety, service quality, and hygiene, Central Railway’s Nagpur Division has intensified its crackdown on unauthorized vending and the sale of unauthorized packaged drinking water at stations and onboard trains. As part of this initiative, special surprise checks are being conducted at various locations to ensure strict compliance with railway regulations. Over the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!