महावितरणला आंदोलनाचा धसका,गावात विद्युत सहाय्यकाची नियुक्ती ;विजेच्या समस्यांचे निवारणाला महावितरणकडून सुरवात

कन्हान :- महावितरण विभागाच्या गोंडेगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या टेकाडी गावात गेल्या काही महिन्यांपासून विजेच्या समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त आहेत,ग्रामपंचायत सदस्य सतीश घारड यांच्या नेर्तुत्वात गावातील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन पाच दिवसात समस्यांचे निराकरण आणि विद्युत कर्मचारी नियुक्त करा अन्यथा सहाव्या दिवशी गोंडेगाव उपेकेंद्र येथे आंदोलन सुरु करण्याची निवेदन १० ऑक्टोबर रोजी दिले होते,१६ ऑक्टोबर रोजी टेकाडी मुख्यालय येथे अंकित यानेश्वर ढोबळे या विद्युत सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.महावितरण विभागाच्या गोंडेगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या टेकाडी गावामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वीजेच्या समस्यांचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे, शिवारातील आणि गावाच्या मुख्य रस्त्यावरील काही विजेचे खांब जमिनीवर पडण्याच्या मार्गावर आहे, त्याच बरोबर विजेचे तार लोंबकाळत असल्याने वीज जाण्याचा प्रमाण वाढले आहे, सोबतच रात्री अपरात्री गावातील विद्युत पुरवठा किंवा नागरिकांच्या घरचा विद्युत प्रवाह वीजेच्या खांबांवरून खंडित झाल्यास तो दुरुस्त कोण करणार हा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण होतो,या सर्व उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास गावात निवासी विद्युत कर्मचारी नसणे ही सर्वात मोठी बाब होती,विद्युत कर्मचारी अधिकारी यांनी शासन निर्णयानुसार मुख्यालयी राहणे अत्यंत गरजेचे असताना शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र गोंडेगाव उपकेंद्र अंतर्गत उघडकीस आलेलं होते,महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात १० ऑक्टोबर रोजी ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. कन्हान,यांची भेट घेऊन गावात तात्काळ एक निवासी विद्युत कर्मचारी गावात नियुक्त करावा सोबतच गावातील विजेच्या समस्यांचे निराकरण करावे तशेच पाच दिवसात गावात विद्युत निवासी कर्मचारी नियुक्त न केल्यास गोंडेगाव उपकेंद्रापुढे आंदोलनाची करण्याची चेतावणी निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली होती,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांना देखील दिलेल्या निवेदनाची दखल घेत त्यांनी जिल्हा परिषद नागपूर येथे सभेला उपस्थित महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून टेकाडी येथील समस्यांचे निवारण करा अन्यथा आंदोलनाला पुढे जावे लागेलं अश्या शब्दात खबर घेतली ज्यावर मुख्य कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ सहाय्यक अभियंता,वीज कर्मचारी यांना घेऊन गावातील लोंबकाळात असलेले विजेचे तयार सुरळीत करून काही ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे आश्वस्थ केले तर १६ ऑक्टोबर रोजी पासून गावात पूर्णकाळ विद्युत सहाय्यक म्हणून अंकित ज्ञानेश्वर ढोबळे यांची नियुक्ती केलेली आहे.लवकरच शिवारातील विजेची समस्यांचे निवारण करण्याचे मुख्य कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शुक्रवार पासुन कन्हान ला बंगाली देवी महोत्सव

Wed Oct 18 , 2023
कन्हान :- सार्वजनिक श्री श्री मॉ दुर्गा उत्सव कमेटी व्दारे माहोरे कॉम्प्लेक्स कन्हान येथील बंगाली देवी उत्सवास २५ वर्ष पुर्ण झाल्याने यावर्षी कमेटी विधी वत पुजा अर्चनासह मॉ दुर्गा, मॉ लक्ष्मी, मॉ सरस्वती, श्री कार्तिक, श्री गणेश मुर्तीची स्थापना करून विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुक्रवार (दि.२०) ऑक्टोंबर पासुन बंगाली देवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.     […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com